जेथे Work in progress चा बोर्ड असतो तेथे No Entry असते, आणि अशा ठिकाणी सर्वच activities बंद असतात हे आपणास पटवून देण्याची आवशक्यता नाही. पण त्याला अपवाद ठरली आहे आपली शीतचंद्रलोक सोसायटी. आपल्या सोसायटीत या वर्षी श्री सत्यनारायणाची पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम कसे होतील हा चिंतेचा विषय चर्चेत होता. चोवीस वर्षांपासून चालत आलेली प्रथा बंद पडते की काय अशी शंका कोणाच्याही मनात येणे साहजिकच होतं आणि कारणही तसंच होतं. चारही विंगच्या गॅलऱ्यावर प्रचंड सामान विखुरलेलं. प्रॅक्टिस करायला जागा कुठंही शोधून सापडणार नाही अशी अवस्था ! बिल्डिंग रिपेअर करण्याचे काँट्रॅक्टरचे समान, सिमेंटच्या गोणी, पाईप, बांबू, कलरिंगचं काम, ग्रील्स चे एकमेकात अडकलेले सांगाडे, विचारू नका सगळीकडे सावळा गोंधळ. परंतु त्या शंकेला सुरुंग लावलाय श्रीयुत पोंक्षे यांनी आणि त्यांना मोलाची साथ दिली ती श्रीमती गौरी गोठीवरेकर यांनी. आपल्या सोसायटीत दिवाळी पहाटही साजरी झाली आणि वार्षिक श्री सत्यनारायणाची पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमही यशस्वीपणे संपन्न झालेत. त्यामुळे सर्वप्रथम मी श्रीयुत पोंक्षे आणि श्रीमती गौरी गोठीवरेकर यांचं मनापासून अभिनंदन करून आभार मानतो.
पहिल्या दिवसाचा कराओके कार्यक्रम इतका बहारदार असेल असं मी तसूभर ही कल्पना केली नव्हती. श्री बालासुब्रमण्यम, श्रीकांत काकडे आणि सुरेश जी यांनी किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि मन्नाडे यांच्या मधुर सुरात चांगल्या चालीची क्लासिकल गाणी गाऊन प्रेक्षकांच्या खिशातल्या रोकडा नोटा बाहेर काढायला लावल्यात. कोणत्या शब्दात या नोटांचं वर्णन करू........सांजकी दुलहन बदन चुराये, चुपकेसे आये. अशी एकसे बढकर एक गाणी सादर झालीत आणि शीतचंद्रलोकवासीयांनी मनसोक्त जुन्या गाण्यांचा आनंद लुटला. काळ्या ढगांच्या फटीतून जशी सोनेरी किरणे चकचकावीत त्या प्रमाणे या सुंदर कार्यक्रमात दुधात साखर पडली ती श्रीयुत पोंक्षे आणि श्रीमती गौरी गोठीवरेकर यांच्या अफलातून धमाल अँकरिंगमुळे. एकवेळा बालासुब्रमण्यम यांनी शंका उपास्थित केली की आप लोगोंको हमारे गाने अच्छे लगते है या इनकी, जो आप इतना रिस्पॉस दे रहे है उनको । त्यांनी तर त्यांच्या कार्यक्रमात येण्याची त्यांना ऑफर ही देऊन टाकली. ओरिजिनल लोक आहेत आमची.
ही कहाणी इथेच संपत नाही तर , पोंक्षे आणि गौरी गोठीवरीकर मॅडम यांनी A B C D च्या अद्याक्षरातून आपल्या आयुष्याचा पैलूंवर भाष्य करून त्यां अद्याक्षरांचा आपल्या समोर रहस्यमय अर्थच सांगितला.
प्रेम, मैत्रीण, आणि कोणत्याही मुलीचं शेवटचं अक्षर A किंवा आय या अक्षरानेच होतो. मी मनातल्या मनात पडताळणी करून बघितली. बायकोच्या शेवटचे अद्याक्षर A नेच संपते, काय आश्चर्य माझ्या तिन्ही मेहुण्यांचे शेवटचे अद्याक्षर सुद्धा.
V आणि H चा अर्थ ही असाच गहन सांगून, शेवटी Z च्या आद्यक्षरातून "झालं गेलं ते विसरा" हा जणू सर्व शीतचंद्रलोकवासीयांना संदेश दिला. झेड अक्षरात एवढी नम्रता मग प्रत्येकाने झेड हे अद्याक्षर आपल्या कोशात संग्रहित केलेच पाहिजे.
दुसऱ्या दिवशी 26 जानेवारी 2019 ला श्री सत्यनारायण महापूजा 12 वाजता संपन्न होऊन चार वाजता सुश्राव्य भजन सादर झाले. महिलांचे हळदी कुंकू उत्साहात पार पडला.
सेक्रेटरी साहेबांनी मला रिक्वेस्ट केली होती की, तुम्हाला अभिप्राय द्यायचा आहे, तुमचे पर्सनल कार्यक्रम असतील ते पोस्टपोन करा. याला मात्र मी अपवाद निघालो, कारणही तसंच होतं - शिर सलामत तो पगडी पचास हे आडवं आलं. दुसऱ्या दिवसाचा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम शीतचंद्रलोक सख्यांनी गाजवला असा सुगंध दरवळला होता असं कानावर आलं. मात्र त्यांचं कौतुक करायचं राहून गेलं
प्रत्येकवेळा काही तरी सुटुन जातं आणि अभिप्राय देण्याचं औचित्य साधून ते सुटलेलं येथे थोडक्यात प्रस्तुत करतो.
सर्व सुखासुखी चाललं असतांना सुद्धा सुखाचा शोध घेतला जात असतो आणि तो थांबत नसतो. कोणी मला सुखाचं निवास दाखवलं तर मी त्याला एक लाख रुपये देईन असं म्हणणारा सुद्धा अजून माझ्या वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेला नाही. हे वाचून माझे जिवलग मित्र श्रीयुत गावडे साहेब मला चिमटे काढतील आणि म्हणतील साहेब अगोदर सोसायटीचा मेंटेनन्स भरा नंतर लाखाच्या गोष्टी करु आपण. ठीक आहे, come to the point मला तुम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की आपल्या सोसायटीचे रिनोव्हेशनचे काम पूर्णत्वाकडे पोहचत आहे. एक अविश्वसनीय प्रोजेक्टची सांगता होईल पण काही आठवणी स्मरणात राहून जातील.
*शीतचंद्रलोक बिल्डिंग रिनोव्हेशन - एक अविश्वसनीय प्रोजेक्ट*
ज्या सोसायटीला २५ वर्षे झालीत परंतु एकही वेळा कलर दिला गेला नव्हता, जो कमीत कमी सहा वर्षातून एक वेळा दिलाच पाहिजे. अशा परिस्थितीत सोसायटीच्या ईमरतीची हालत फारच खराब झाली होती. ओपन झालेले पिलर्स , तडे पडलेल्या भिंती, उखडलेले प्लॅस्टर, गॅलरीची झालेली दुर्दशा आणि अशा परिस्थितीत गोळा झालेला सभासदांचा अपूर्ण रिपेअर फंड हा सभासदांना वापस करावा लागला. आणि साहजिकच प्रोजेक्ट लांबला. त्यातच स्टील, सिमेंट, रेती इत्यादी मटेरियल ची वाढलेली महागाईने कळस गाठला होता. परिणीती बजेट फुगलं.
स्ट्रक्चरल ऑडिट झाले, पेपरला जाहिरात दिली गेली, निविदा मागविण्यात आल्यात. कन्सल्टंट ची नेमणूक करण्यात आली. श्रीयुत फाटक साहेबांनी चॅलेंज स्वीकारलं, टीम कमिटी आणि नॉन कमिटी मेंबर्स यांनी त्यांना मोलाचं सहकार्य दिलं. रिनोव्हेशन केलेल्या सोसायटींचा वाशी, कल्याण येथे सर्वे करण्यात आला. काँट्रॅक्टरची निवड करण्यात आली, ऍग्रिमेंट बनवून त्याचं वाचन करून अर्थ समजावून घेण्यात आला. शंका objection यांचं निरसन करण्यात आलं. सोसायटी सभासदांना विश्वासात घेण्यात आले. फंड वसुली साठी कमिटीने पराकाष्टा केली. हे काम आणि हा प्रोजेक्ट साधा आणि सरळ नाही याची सर्वांना कल्पना आली होती. महिन्याला कधी पाच ते कधी सहा मिटिंग्ज घेण्यात आल्यात. फंड मॅनेजिंग श्रीयुत पावसकर साहेबानी सांभाळला, टेक्निकल बाजू श्रीयुत कुंभार आणि सचिन सुर्वे यांनी संभाळल्यात. श्री वेणूगोपाल आणि अमर यांनी टेंडर बनवून साचेबंद केले. श्रीयुत गायकवाड, काटकर आणि चव्हाण यांनी कामाची मोजदाद आणि आपापली नेमून दिलेली कामे यथोचित संभाळलीत. श्रीमती गुरव आणि सौ.गावडे यांनी ठरवून दिलेली कामे करून हातभार लावला. असा हा अविश्वसनीय प्रोजेक्ट म्हणजे प्रचंड मेहनत आणि दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर "अनबिलिव्हेबल" अशा प्रोजेक्टचं काम पूर्ण होत आहे. And credit goes to *"Mr. Pathak and his team"* How is the josh मी सर्जिकल स्ट्राईक वर बोलत नाही. एक वर्षांपासून काम चालले आहे आणि सर्वांना खूप त्रास होत आहे. हे तुमचं म्हणणं खरं आहे. परंतु त्याच्यात GST आडवा आला आणि विश्वकर्माने आपल्याला मार्ग दाखवला. त्यांच्यापासून खूप शिकायला मिळाले. त्यांच्याशी आपलं एक नातं निर्माण झालं हीच त्यांची आणि आपली ओळख स्मरणात राहणार आहे. शितचंद्रलोकच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांनी अशीच कृपादृष्टी शीतचंद्रलोकवर ठेवावी ही आर्जव आम्ही करतो.
खरं सांगू इच्छितो, आपले आभार व्यक्त करण्यासाठी मला शब्द सापडत नाहीत, आपण म्हणजे श्रीयुत गाडगीळ, श्रीयुत पोंक्षे, श्रीयुत चौधरी, मिसेस गोठीवरेकर आणि श्रीयुत पावसकर यांनी कमिटी सभासदांचा जो गौरव केला आहे, ती अप्रतिम भेट स्वीकारून आम्ही भारावून गेलो आहोत. भारावून गेलो आहोत.
धन्यवाद