Sunday 17 December 2017

सिएससी के शोले



विखुरलेले CSC चे रेशीमधागे काल 16.12.2017 ला  येवूर मध्ये कुठलाही गाजावाजा न करता दाखल झालेत. श्रीयुत खडकीकर, इंगळे, तिमिर, वांजपे, पराग, पाठक, पारे, दाभोळकर, अभय, सोमण आणि ज्यांच्या शिवाय पिकनिक पूर्ण होवू शकत नाही, "अगर मगर कुछ नंही तुमको आनाही पडेगा", अशी नेहमी प्रेमाची, हक्काने आर्जव करणारं ते नांव म्हणजे रामदास मगर. हे सर्व धागे एकत्र आल्यानंतर एक गुंता निर्माण झाला आणि तो सुटता सुटेना. सुरुवात कशी आणि कुठून करवी. ज्या CSC ची प्रत्येक विट आणि विटची जडण घडण खडकीकरांच्या हातून झाली, आणि invoicing साठी काहीही आणि कितीही वेळ थांबण्याची जिद्द, कौशल्य त्यांच्या अंगी होती. तो CSC ठाण्याचा पहिला दिवस होता. रात्रीचे साडे आठ वाजलेत. एम.आय.डी. सी.चा पाईपलाईन रोड, अंधारी रात्र, शुकशुकाट, आणि बिबट्याचा वावर अशा उडत्या बातम्या काळजात धस्स करीत होत्या. आम्ही सर्वजण खडकीकरांसह रामदासजींच्या अँबेसॅडर मध्ये बसलो होतो. आणि मध्ये रस्त्यावर गाडी बंद पडली. मी बघितलं साहेब स्वतः गाडी ढकलत होते. सांगायचं तात्पर्य CSC टीम अशी घडवली त्यांनी. त्याच शिडीचा आधार घेत अल्फा लावल मध्ये मला रिटायरमेंटचं सौभाग्य लाभलं.



प्रभाकर श्रीवास्तवसाहेबांनी CSC ला आकार दिला. कामात लिबर्टी दिली. योगा, क्रिकेट, पिकनिक तसेच बेंगलोर, नेपाळ, केराला, दिल्ली, नैनिताल, राजस्थान हॉटेल राजपुताना या सौंदर्यस्थळांची भेट घडूवून आणली. त्यांच्या काळात वातावरण नेहमी भारावलेले असायचे. त्यांच्या कारकिर्दीला सलाम. त्या काळात अजून दुसरं तिमिर नावाचं असं एक रसायन CSC ला लाभलं होतं. हे रसायन जिथं मिसळलं तो प्रॉब्लेम सुटलां असं समीकरण झालं होतं. तिमिरचं नेचर आणि काम करण्याची पद्धतीमुळे  मी म्हणजे आम्ही CSC टीम खूपच भारावून गेलो होतो. मला आठवतं तिमिर कडून सिगरेट सुटत नव्हती. एका पार्टीत मी हस्तक्षेप करत आव्हाहन दिलं, तिमिरने जर सिगरेट सोडली तर आजच्या पार्टीचं बिल मी भरतो. आणि तिमिरने सिगरेट सोडण्याची घोषणा केली. आशा आहे की तिमिरने त्या माझ्या भावना अजून जपून ठेवल्या असतील !!  तिमिर, अभय आणि जितेंद्र बरोबर काम करायची चांगली सवय लागली होती, झाला परिणाम असा की तिमिरने अल्फा लावल सोडल्या नंतर मी सुद्धा अल्फा लावल सोडून तिमिर बरोबर जाण्याचं बोलून दाखवलं. त्यावेळी तिमिरने मला चांगली समज दिली, माझं क्षेत्र अलग आहे आणि तुझं अलग!  नंतर कालांतराने टेट्रा पॅकला कुमारने मला बोलावलं होतं, पण तिथे मी गेलो नाही. आठवणी जाग्या झाल्यात म्हणून मोकळं केलं इतकंच.



अभय बरोबर लोकल मधून प्रवास करतांना कसलंही भय नसायचं. ठाण्याला उतरतांना माझ्यामागे उभे राहून सर्व डोंबिवलीकरांना अडवून ठेवायचे आणि मला सांगायचे बघ ! मागचे कसे डुकरासारखे कुजबुज करता आहेत!  पण पाऊस पडत असेल तर इंगळेंच्या छत्रीत आणि गाडीत जाण्याची मजा कुछ और ही था !  समोरच्याचं कुशल विचारण्याचं हा त्यांचा स्वभावाचा पैलू होता. हात पाय न हलवता पाण्यात उताणे होऊन पोहणे ही कला वांजपेना चांगलीच अवगत आहे. फुल नाईट OA किन करण्यात दाभोळकरचा हात कोणीही धरू शकणार नाही. म्हणून OA कीन करण्यासाठी मॅन पॉवर कधी वाढविली गेली नसेल कदाचित. दाभोळकरने मला दिलेली "पुण्याची पगडी" अजून सांभाळून ठेवलेली आहे. जितेंद्रने करून दिलेला Executable Order List हा प्रोग्रॅम हा CSC ला संजीवनी ठरला. सिस्टिम चेंज झाल्यात, पॉलीसी बदलल्यात, बॉस बदललेत, परंतु हा प्रोग्रॅम अजून बिनबोभाट चालू आहे. पराग आणि भास्कर सारखे इमोशनल, सिंसेअर, हॉनेष्ट, पंक्चुअल मित्र कोणी असूच शकत नाही असा अनुभव गाठीशी आहे. अजून मित्र आहेत त्यांचं नाव घेतल्या खेरीज आजचा ब्लॉग पूर्ण होवू शकत नाही. श्रीयुत एम एम पारे, व्ही.जी.पाठक, अनंत पाठक, के.व्ही.अय्यर, व्ही.पी.देशमुख, गुलशन भाटिया, इम्तियाज, इथापे, व्यंकट, डी.बी.राव, जगत याज्ञीक, वैभव पंडित, सतीश ओझा, कोमल भट्टाचार्य, प्रवीण येलने, बाबर, बाबुराजन, सी.के.रवी, चंद्रसेकरन, सचिन गोडसे, सोमण, राजेश गुंडा, राजेश हिवाळे, धनंजय गाडगीळ या सर्वांच्या आठवणीत डुबायाचं म्हणजे येवा येवूर आपलोच आसा.