उष्ण कटिबंधातले वाहणारे वारे एखादे वेळेस तुम्हाला शिथिल आढळतील, परंतु हिवाळी मोसमाचा गारवा असून देखील सुद्धा , भारतात सध्या निवडणुकीचे विषम आणि उष्ण वारे वाहत आहेत. आणि राजकारणातला दूषित घनकचरा इतका उफाळून वर आला आहे की सध्याचं सर्व वातावरणच प्रदूषित झालं आहे. कोणी कोणावर कसेही हीन दर्जाचे आरोप करत सुटला आहे. ह्या दुषीत घनकाचाऱ्याला जाळण्यासाठी कायद्याची कुठलीही चौकट अस्तित्वात नाही. म्हणून व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली या लोकांनी चांगलेच अवडंबर माजविले आहे. याच्यात न्युज पेपर आणि मेडिया वाल्यांनी सुद्धा काही प्रमाणात आगीत तेल ओतण्याचं काम प्रामाणिक पणे करीत आहेत. गोळ्या नसलेल्या बंदुकीचे फुसके बार उडविण्याचे जनक म्हणून क्रेडिट आप पक्षाचा म्होरक्याकडे जाते. कोणताही हातात पुरावा नसतांना करोडो रुपये भ्रष्टाचार केलेल्या पंधरा ते वीस लोकांची लिस्ट जाहीर करणे, हा त्यांचा हातखंडा झाला होता. पण त्यांना एकालाही दोषी सिद्ध करता आलं नाही . पण अण्णा हजारेंच्या चळवळीत सामील होऊन दिल्लीत दुकान थाटून बसले हे मात्र खरे. त्याप्रमाणे आपल्या पक्षालाही देशाच्या मध्यभागी दिल्लीत चौकीदाराची नोकरी मिळावी म्हणून काँग्रेसपक्षपती यांनी रोज पंतप्रधानांवर फुसके बार फोडण्याचे अजब शस्त्र शोधून काढलं आहे. काँग्रेस पक्षाच्या साठ वर्षांच्या राजकिर्दीत असंख्य करोडो रुपयांचे महा घोटाळे झालेत हे जनता विसरली असेल असं त्यांना वाटतंय. साठ वर्षे निर्विवाद अधिराज्य करणारा काँग्रेस पक्ष 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत चक्क 45 या आकड्यावर आपटला होता. मोदींनी विश्रांती न घेता विकासाचा ध्यास घेतला. शेतकऱ्यांची कर्जे माफ केलीत. इराणची थकित रक्कम देण्यासाठी मोदी सरकारने रणनीती, आराखडा आखला, सहा हप्त्यांमध्ये संपूर्ण ४३ हजार कोटीचं थकीत देणं भारतानं दिलं. जीएसटी आणि नोट बंदीचं धाडसी निर्णय घेण्यात आला. परिणाम असा झाला विरोधकांची दुकाने बंद झालीत, प्रत्येक रुपयामागे सरकारला कर मिळू लागला. टॅक्स रूपाने जमा झालेला पैशाने सरकारी तिजोरीत चांगलीच भर पडून जनकल्याणासाठी योजना सरकारकडून सुरू करण्यात आल्यात. वचनपूर्तीसाठी अथक प्रवास करायचा असतो तो त्यांनी या साडेचार वर्षात केला आणि आज भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. बघता बघता 2019 च्या निवडणुकीचे सर्वानाच वेध लागलेत. पण रान कधी सपंतच नाही. काळोख सुरू झाल्यावर भर अरण्यात प्रकाशित चांदण्यांची सुद्धा भीती वाटायला लागते. महापुरात सापडलेल्या ओंडक्यांना काडीचा आधार हवा असतो तशी विविध पक्षांची गत झाली. आपलं अस्तित्व जणू धोक्यात आलं आहे आणि ते टिकविण्यासाठी, नाही ते हीन दर्जाचे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. ही विकृती एवढ्या टोकाला पोहचली, की पंतप्रधानांना नाही त्या हलक्या दर्जाच्या उपाध्या विरोधकांनी दिल्यात. आणि त्यात कोणीही मागे राहिले नाही. व्यक्ती स्वातंत्र्यच्या नावाखाली अवडंबर माजवून भारतीय संस्कृतीची ऐशी की तैशी करून टाकली. शहरात ओला सुका घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक यंत्रणा सज्ज असते. परंतु राजकारणात अतिरंजित तोंडाळ राजकारणी घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे मतदारच पुढाकार घेवून अश्या प्रदूषित राजकीय दूषित घनकचाऱ्यांची मतदानाद्वारे विल्हेवाट लावू शकतात. आणि ही संधी फक्त पाच वर्षांनी एकदाच येते.
Monday, 26 November 2018
Saturday, 10 November 2018
शीतचंद्रलोक दिवाळी पहाट २०१८
अजून पान जागे, फुल जागे, भाव नयनी जागला
श्रीमती पेडणेकरांचे विशेष कौतुक, की ज्यांनी निवेदनाची रूपरेषा आखून दिली होती. तुमचं ज्ञान कौशल्यं चं प्रतिबिंब त्या नितळ निवेदनात दिसलं.
अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते,
खुरट्या बुंध्यावरी चढून, अजून बकरी पाला खाते.
रात्र अजून रात्रीच्या काळोखातच गुरफटलेली होती. रात्रीच्या गर्भातला लालबुंद आणि तांबूस रंगाचा गोल पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडायला बराच अवकाश होता. आकाश स्वच्छ आणि निरभ्र व्हायला जणू त्यानेच मोकळीक करून दिली होती. अन अशा भव्य मंडपाखाली, शीतचंद्रलोक सोसायटीच्या प्रांगणात एक नवीन पहाट उदयास येत होती. नवीन कपडे परिधान करून आलेल्या लेडीज, जंट्स तरुणाईची लगबग चालू झाली होती. नव युवतींनी रंगमंचकासमोर काढलेली भव्य देखणी रांगोळी लक्ष वेधून घेत होती. तुळशी वृंदावन अंगणात मध्यभागी सजले होते. स्टेजवर दिव्यांचा झगमगाट होता. आकाश कंदील नेहमी प्रमाणे तटस्थ स्टेजच्या मध्यभागी मिणमिणत्या प्रकाशात लुकलुकत होता. थोड्याच वेळात दिवाळी पहाट २०१८ चे पाचवे पुष्प गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात गुंफले जाणार होते. ज्यांनी १५७ पटकथा लिहून दोनशे पेक्षा जास्त गाण्याचा खजिना आपल्याला उपलब्ध करून दिला होता. हळू हळू काळोख्यातल्या सर्वच चांदण्या भूतलावर अवतरुन प्रज्वलित झाल्यात, एक चांदणीने मात्र दूर काळोखातच अढळपद स्वीकारलं आणि एका अनुत्तरीत प्रश्नाचं वलय निर्माण होऊन कुतूहल जागं झालं. सकाळचे साडेपाच वाजलेत, रंगमंचकावर सर्व कलाकार भारतीय बैठक मारून स्थानापन्न झालेत. उत्सुकता शिगेला पोहचली होती. पहाटे पहाटे शेतकऱ्याने गोफणीतला दगड आपल्या उभ्या पिकांवर भिरकावून, भुर्रकन उडणाऱ्या पक्ष्यांचा विहंगमय आवाज अजून तरी कुठल्याही कॅमेरात नजर कैद झाला नव्हता. आणि तेवढ्यात संगीत मानापमान नाटकातील नयन नटवरा विस्मयकारा या समूह गीताने कार्यक्रमाला दमदार सुरुवात झाली.
शांत भासणाऱ्या अथांग जलाशयाच्या पृष्ठभागावर उडणाऱ्या पक्षाच्या पंखाचा स्पर्श व्हावा आणि त्यातून निर्माण होणारी असंख्य वलये हळू हळू शांतपणे विस्तारीत जावून अदृश्य व्हावीत, त्याप्रमाणे निवेदिका मिसेस गाडगीळ यांनी एकेक गाण्यांचे पदर उलगडतांना आपल्या मृदू, शांत आणि सुमधुर आवाजाने हवेत आद्रतेची वलये निर्माण केलीत. प्रेक्षकांना भुरळ पडली ती त्यांच्या ओघवत्या भाषा शैलीवर. गाणं संपल्यानंतर पुढचं गाणं कसं गुंफलं जाणार आहे, त्या गाण्याचे बोल काय असतील आणि त्या गाण्यांचे आपल्याशी नाते ते कसे उलगडतात यांकडेच सर्व प्रेक्षक कौतुकाने त्यांच्याकडे बघत होते.
सौ समता पावसकरांनी तूच सुखहर्ता तूच दुखहर्ता हे मूळ प्रल्हाद शिंदेच्या आवाजातील गाणं गाऊन एक प्रकारे जगाच्या कल्याणासाठी देवाला साकडं घालून प्रेक्षकांची मने जिंकलीत. त्यांच्या आवाजातला कणखरपणा हा शिक्षकी पेशातून उदयाला आलेला नजराणाच होता. वाऱ्याच्या झोताने शेतातली जोंधळ्यांची ताटं पानं हलवून जशी मुजरा करतात त्याप्रमाणे प्रेक्षक या गाण्याला तल्लीन झाला.
आणि प्रेक्षकांच्या एकाग्रतेला खंड न पडू देता श्री संजय पुराणीक यांनी, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांच्या आवाजातलं नाचत नाचत गावे हे गाणं गाऊन प्रेक्षकाला ब्रम्हानंदे तल्लीन व्हायला लावलं.
आताच झिणी झिणी वाजे बीन वाजे सख्यारे हे मूळ आशा भोसलेंच्या आवाजातलं गाणं आपण त्यांच्या आवाजात ऐकलं, ज्यांनी निवेदिकेची भूमिका आजपर्यंत अगदी सहजपणे हसत खेळत पार पाडली होती, शितचंद्रलोकच्या रंग मंचकावर होणाऱ्या नाटकात आजपर्यंत बहुमूल्य योगदान त्यांनी दिलं होतं, "साजणी बाई येणार साजण माझा" ही गायलेली लावणी दिवाळी पहाट २०१५ चं एक खास आकर्षण ठरलं होतं. आणि आता असे किती बरे स्वल्पविराम देऊन पुढे जात राहिलो तर त्यांचा नांवाचा उल्लेख करायला विसरेन मी. त्या म्हणजे, श्रीमती गौरी गोठीवरेकरांना मागे वळून बघायला वेळ कुठे आहे. आज तर त्यांनी कानडी भाषेतलं भाग्यदा लक्ष्मी बरंम्मा हे भजन गाऊन आश्चर्याचा धक्काच दिला. न जाणो भविष्यात त्यांच्याकडून कोणत्या सप्तगुणांची मालिका बघायला मिळेल. आत्ताच असा खोल पाण्यातला तळ न बघितलेला बरा ! परंतु शितचंद्रलोक मधील प्रेक्षकांना समजावणार कोण !
गदिमांचं विकत घेतला शाम बाई मी, विकत घेतला शाम आणि नेसले गं बाई चंद्रकला मी ठिपक्यांची अशा सुदंर गाण्यांची निवड करून सौ साक्षी सनगरे यांनी त्यांच्या सुंदर आवाजात गाऊन प्रेक्षकांची मने जिंकलीत. त्यांच्या आवाजात गोडवा आहे.
आटपाट एक शीतचंद्रलोक नावांचं नगर होतं आणि त्या नगरात तिचा आवाज घुमतो असे म्हणतात. तर उर्वी तिचं नांव असावं. तीने ज्या स्वरात सुरेख आणि अप्रतिम असं गाणं गायलं, त्या शब्दांचा मोह मलाही आवरता आला नाही आणि चक्क मी माझ्या या अभिप्रायाला त्याच शब्दांची फुले वाहिलीत. अजुनी पान जागे, फुल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षीला. गाडगीळ साहेबांनी सुरेख साथ दिली.
सौंदर्याची उधळण तू
लई दिसाची हौस राया, चला आता पुरी करू, चला जेजुरीला जाऊ हे गाणं गाण्यासाठी एकाच या जन्मी जणू फिरुनी जन्मेन मी नव्हे तर पुढच्या वर्षी फिरुनी हीच लावणी गाईन मी. झी चोवीस तास गौरवीत सौ शोभा गावडेंना सौंदर्याची उधळण तू, नवरत्नाची खाण तू म्हणत परत एकदा वन्स मोअर होऊ द्या अशी सर्व जण आतुरतेने वाट बघत आहेत.
प्रीत लपवुनी लपेल का, लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का.श्रीयुत पुराणिक काकां, वॉ क्या बात है. जीसकी तारीफ करना भूल जाय, उससे बडी दाद और क्या हो सकती है.
मनात सुंदरा तूझीच मूर्ती श्यामला आणि २०१५ ची दिवाळी पहाटचं शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी चंद्र आहे. अशी एकाहून एक क्लासिकल गाणी आजपर्यंत आपण गायलीत. गाडगीळ साहेब, मनात सुंदरा तूझीच मूर्ती श्यामला तुम्हीच आहात.
देहाची तिजोरी, भक्तीचाची ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा हे जगदीश खेबुडकरांचं गीत सुधीर फडके यांच्या अवजातलं गाणं, काटकर साहेबानी गायलं आणि एका नवीन कलाकार गवसला. त्यांच्या गाण्यावर एवढा कमांड होतं जणू ते आपल्या माध्यमिक शाळेपासून गात असावेत. त्यांना संगीताची देखील आवड आहे असं कळलं. Very good, Excellent
श्रवण गोठीवरेकर - माळीण नाटकात झलक दाखविल्यानंतर सायन आया गाणं गातांना चेहऱ्यावरच्या छटा आणि मुरलेले हावभाव बरच काही दर्शवीत होते. आम्ही म्हणतो म्हणून नव्हे, आता तू सायनला उतरुच नको , असाच पुढे जात रहा. यशस्वीभव.
टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. हा अभंग अप्रतिम आवाजाचं लेणं लाभलेल्या नेहा आणि उर्वी यांनी सुरेख आवाजात गायला आणि शीतचंद्रोक मधील पहाट पंढरीमय झाली.
श्रीमती पेडणेकरांचे विशेष कौतुक, की ज्यांनी निवेदनाची रूपरेषा आखून दिली होती. तुमचं ज्ञान कौशल्यं चं प्रतिबिंब त्या नितळ निवेदनात दिसलं.
ज्यांना जर कधी एखादा दुर्मिळ धागा सापडला तर त्याच्यावर एक तास लेक्चर देणारे आणि ज्यांना त्यांची स्तुती केलेली अजिबात आवडत नाही ते श्रीयुत पोंक्षे साहेब आज मला थांबवूच शकत नाहीत. त्यांनी एका उत्कृष्ट गाण्याची निवड केली होती. मंगेश पाडगावकरांचं गीत, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. गाण्याचे शब्दच त्यांच्या सर्जनशीलता विषयी बोलून जातात. दिवाळी पहाटची सुंदर चकाकणारी किनार त्यांच्यामुळेच प्रकाशित झाली. परंतु हे श्रेय ते स्वतः घेत नाहीत. कोणतंही प्रिप्रेशन नसलेला कागद हातात नसतांना सर्वांचे आभार प्रदर्शन मानून काही चुकलबिकल तर क्षमा असावी असे भाव प्रगट करून कार्यक्रम वेळेत संपवतात. उद्देश साध्य झाल्यानंतर ग्रुप क्लोज सुद्धा करतात. अशा व्यक्तिमत्वाला सलाम. अध्यक्ष श्रीयुत फाटक आणि सेक्रेटरी श्रीयुत कुंभार यांनी दिलेले मोल अनमोल आहेत. श्रीयुत सनगरे यांचं विशेष कौतुक की ज्या कार्यक्रमासाठी तुळशीवृंदावन आणि आकाशकंदील चं ते वर्षभर काळजी घेतात.
दिवाळी पहटच्या निमित्ताने व्यक्तिमत्वाला सांस्कृतिक आकार देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्फुर्ती गीताने संपन्न झाला.
कितीही परिसर जलमय झाला, तरी शुभेच्छा वर्षावाचा बोर्ड वाहून जाणार नाही. कारण त्याची ओहरहेअड वायर मजबूत आहे. म्हणून बा. सी. मर्ढेकर त्यांच्या कवितेत म्हणतात,
अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते,
खुरट्या बुंध्यावरी चढून, अजून बकरी पाला खाते.
धन्यवाद
Subscribe to:
Posts (Atom)