मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५
पुरणाच्या पोळ्या
अक्षय तृतीया, होळी, बैल पोळा आणि दिवाळीला किंवा कोणतेही शुभ कार्य असो की कोणताही सण असो आमच्या खानदेशात पुरणाच्या पोळ्या हमखास बनविल्या जातात. चणाडाळ रात्रभर भिजत घालून सकाळी पाटावरवंटावर गूळ मिश्रित करून येथेच्छ रगडून म्हणजे वरवंट्याने वाटून पुरण बनविले जाते. मातीची चूल आणि मातीचेच खापर आणि चुलीत धगधगता विस्तव. विस्तव म्हणजे एवढा धगधगता की एक टक नजर लावून नाही बघू शकत आपण त्याच्याकडे. त्या मातीच्या खापरावर भाजल्या जाणाऱ्या पुरणपोळ्यांना एक विशिष्ट प्रकारची चव निर्माण होते. ज्या ज्या वेळेस सणानिमित्त मी गावी जातो त्या वेळेस आमच्या काकूच्या हातच्या पुरणपोळ्या म्हणजे जणू भरजरी तलमवस्त्र आपल्या ताटात मांडून ठेवले आहे असा भास होतो. चव म्हणजे सांगून नाही सांगता येणार त्यासाठी येवा खानदेश आपलोच आसा. मु.पो. धामणगांव तालुका चाळीसगाव.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा