बरोबर सकाळचे 8.30 वाजलेत. सकाळी चहा हवा असतो ना, म्हणून दुध घेण्यासाठी बाहेर पडलो. पाऊस आपली हजेरी लावून निघण्याच्या तयारीतच होता पण झिरमीर झिरमीर चालूच होता. मी पण गरज नसतांना छत्री बरोबर घेतली. छत्री ऊघडली तेवढ्यात न्युजपेपर टाकणारा मुलगा हातात पेलवेल एवढं वर्तमानपत्राचं मोठं बंडल घेऊन सोसायटीच्या अगोदरच सताड उघड्या असलेल्या गेटमधून आतमध्ये शिरला. त्याला म्हणालो बाबा वरचा पेपर ओला होतो आहे छत्रिचा वापर कर, योगायोगाने वरचा पेपर माझाच होता, परंतु त्याला काही त्याची फिकीर नव्हती. मी त्याला बी वींग पर्यंत छत्रीत घेऊन सोडलं. शेवटी अनावर झालेला सकाळचा पाऊस माझी छत्री भिजऊनच शांत होत गेला आणि गेटच्या बाहेर पडताक्षणी क्षणभर मी थबकलोच. उजव्या बाजूला नजर टाकली आणि ते सकाळचं द्रुष्य डोळ्यात साठऊन घेतलं. एरवी कामावर जाणाऱ्या गजबजलेल्या वस्तीच्या या रस्त्यावर आज चिटपाखरू देखील नव्हते. कदाचित रविवार असल्यामुळे असु शकेल. डांबरी रोड मात्र ओला चिंब होऊन स्वच्छ निग्रोसारखा भासत होता. हवेत गारवा होता. रस्त्याच्या कडील झाडे कोणाच्या स्वागतासाठी जणू तबक घेऊन शांत ऊभी होती. मनात एक ऊसासा भरला आणि फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही. जागो जागी पार्कींग केलेल्या अलीशान गाड्यामुळे रस्त्याचं सौंदर्य अधिकच वाढलं होतं आणि त्यामधून बहीणाबाई गार्डनला वळसा घेत सुनीलनगरवरून अशोकवाटीकेकडे गेलेला त्या स्वच्छ डांबरी रस्त्यावरून न थकता पळत राहावे, पळत राहावे अन नुसतं पळत राहावे असं वाटायला लागलं.....शेवटी पळण्याचा मोह आवरता आला नाही. बघा आपण देखील प्रयत्न करू शकता. हवी हवीशी वाटणारी सकाळ आपण राहतो तेथेच असते. सकाळ एवढी सुंदर असते तर पहाट किती प्रसन्न असेल.
Sunday, 15 October 2017
रविवार सकाळ

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment