सोसायटीतील कुटुंबीयांशी माझं कोणतं जन्मो जन्मीचं नातं आहे, हे डहाळीला समजण्यासाठी कळ्यांना उमलावं लागत नाही, परंतु हे नैसर्गिक लेणं परमेश्वराने मानवाला बहाल केले असतं तर ही वेळच माझ्यावर आली नसती हे मात्र खरे, पण जेंव्हा मला हे समजलं, त्यावेळेस मी अतिशय भारावून गेलो. नवरा-नवरीचं शितचंद्रलोक मध्ये रात्री बारा वाजता आगमन होणार होतं. सोसायटीच्या गेट वर शितचंद्रलोक कुटुंबिय त्यांची आतुरतेने वाट बघत होते. वेळो वेळी, वधू वराची गाडी कुठपर्यंत पोहचली त्याचं स्टेटस विचारलं जात होतं. सर्व जेष्ठ मंडळी आणि विशेष करून शीत चंद्रलोकच्या संख्या यांनी नव वधू-वर यांचं स्वगत केलं. नवरदेव आणि नव्या सखीचं औक्षण करण्यात आलं. रांगोळ्या, लक्ष्मीची पाउले, गेट पासून ते गृह प्रवेशपर्यंत फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. गेट पासून बी विंगच्या निवसस्थानपर्यंत मंगल धून वाजवण्यात आली. त्यात दुधात साखर टाकली गौरवने. मी पुण्याच्या ग्राउंडवर बघत होतो क्रिकेट, श्वेताला पाहून पडली माझी विकेट_गौरव (मुलं काय छुपी रुस्तम असतात ना !!) तब्बल त्रेपन्न शितचंद्रलोक वासीयांनी बस मधून लग्नाला येवून वधू-वरास आशीर्वाद दिला, अन हा माझा आयुष्यातला हायेस्ट स्कोअर बघून मी कमालीचा गोंधळलो. सारेच काही अद्भुत आणि समजण्याच्या पलीकडे. किन अल्फाजोमे मैं शुक्रिया अदा करू असे राजेश खन्ना आपल्या आवडत्या फॅन बद्दल एका मुलाखती मध्ये म्हणाला होता तेंव्हा त्याची अवस्था किती केविलवाणी झाली होती हे मला आठवलं. लग्नाच्या घाई गडबडीत माझी पेन्सिल मी म्यांन करून ठेवली होती याचे मला भान राहिले नाही. म्हणून मी माझा शब्द संग्रह रिता करून बघितला परंतु गंजलेल्या कुलुपाला कोणतीच किल्ली लागायला तयार नाही हो. शेवटी आपले आभार न मानता आपल्या ऋणात राहायचे ठरवलं आणि हे ऋण मी माझ्या साहित्याच्या ब्लॉग वेब पेजवर आजीवन जतन करून ठेवणार आहे.
परंतु आज झालं काय, सकाळी सकाळी सूनबाईने आयुष्यातला पहिला वहिला गरम गरम वाफाळलेला चंहा हातात दिला आणि एक अद्भुत वातावरणाची निर्मिती झाली. काय आनंद असतो तो चहा पिण्यात. जावे त्याच्या वंशा असे म्हणतात ना तेंव्हा मला कळले. आणि त्या निमित्ताने म्यांन केलेल्या लेखणीलाही लिहिण्याचे स्फुरण मिळाले. पहिल्या दिवशी किती मजेशीर फजिती असतात ते आज अनुभवला मिळाले. बघाना, नव दाम्पत्याने पाणी गरम करण्यासाठी चक्क कळशी आणि हंडा गॅस शेगडीवर ठेवला.
आईच्या उबदार कुशीतून कधी अचानक फुलपाखरासारखं
मन मौज मस्ती करत सुटयायचं.
कधी शुभ्र झऱ्याच्या पाण्याखाली दडून राहायचं
तर कधी शुभ्र शिंपल्यात वाळूत मचून राहायचं
आज तेच मन शुभ मुहूर्ताच्या दिनी
तृणांच्या पात्यावर दवबिंदू होवून
हळूच जमीनीत विरघळलं
No comments:
Post a Comment