हिंदुस्तानात सध्या एका बाजूला प्रचार सभेतला नेत्यांचा बयान बाजीचा स्तर इतका कमालीचा घसरला आहे की नेत्यांनी आपल्या जिभेचं कव्हर बाजूला काढून तिला मोकाट सोडून दिली आहे. महाराष्ट्रात सुद्धा जागो जागी त्यांच्या बिया पाणस्थळी रुजल्या आहेत.
प्रश्नांना विचित्र लॉजिक लावून भाजपकडे राजसाहेबांची उत्तरे नाहीत हा एक चर्चेच्या विषयाला उत आला असताना राज साहेब असे प्रश्न इतर प्रमुख पक्षांच्या नेत्यांना विचारण्याचे धाडस दाखवत नाहीत हा सस्पेन्स आपण समजू शकतो. नोटबंदी, शौचालय आणि इतर विविध विषयांवर भाष्य करताना साहेबानी विचित्र लॉजिक लावून सुंदर टिपण्या करून नितळ पाण्यात शेवाळ बाजूला करण्याचा प्रयत्न केला आहे. पण वाईट एवढंच वाटतं त्यांनी संधीचं सोनं नाही केलं. राजकारणात काहीही होऊ शकतं हे त्यांना चांगलं माहीत आहे. राष्ट्रवादीनेच मोदीला पाठिंबा दिला तर सारंच मुसळ केरात !! . पण असो, आम्हाला राजसाहेबांचा एक तरी उमेदवार पाहिजे होता, प्रचंड बहुमताने जनतेने त्यांना निवडून दिलं असतं. संसदेत आवाज दुम दुमला असता साहेबांचा. संधी चालून आली होती पण दारालाच कडी लावलेली होती म्हणून ती वापस निघून गेली. साहेब स्वतःच्या बागेतल्या झाडांना पाणी द्यायची चिंता नाही करत, जंगली झाडं तर बिगर पाण्याने पण जगतात, साहेब त्यांची चिंता करतांना घमेघुम झाले आहेत. मतदार आणि कार्यकर्ते बुचकळ्यात पडलेत ! हे मात्र खरं आहे

No comments:
Post a Comment