सध्या राजकारणात "लबाड" या शब्दाने जबरदस्त धुमाकूळ घातला असून तो खऱ्याला खोटं, आणि खोट्याला खरं करण्यात गुंतलाआहे. त्याने विकृतीची एक नवीन परिभाषा जन्माला घातली असून लोकशाहीचं मूल्य त्याने आपल्या आतल्या खुंटीला बांधून ठेवलं आहे. निरनिराळ्या स्टेजवरून राजकीय मुखवट्याद्वारे जनतेला तो सहजपणे दर्शन देतो. तो कधी वर्षाला बहात्तर हजार रुपयातून तर कधी शेतकऱ्यांची दोन दिवसात कर्जे माफ करण्यात गुंतला आहे. कोणत्या स्टेजववरून तो घरटी एक सरकारी नोकरीचं आमिष दाखवेल, तर कोणाला दरवर्षी दोन लाखाची मदत करेल याचा ताळमेळ सांगण्यास कोणी तयार नाहीत तरी सुद्धा तज्ञ मंडळी या लबाड्याला भरीव पाठिंबा देतात हे आश्चर्यकारक खेदजनक आहे. खोटं का असेना, एक मात्र नक्की की सर्व भारतीयांना चांगले दिवस येतील अशी अमिष त्याने दाखविली आहे. आपला भारत देश हा अतिशय श्रीमंत देश असून सुख समृद्धी साधनांनी विपुल असा आहे, अशी त्याने खोटी खोटी प्रतिमा जगापुढे सादर केली आहे. भारताचा जागरूक मतदार मात्र अचंबित झाला असून तो आपले रंग रूप कसे दाखविणार हे 23 मे 2019 ला आपल्याला समजेल.
No comments:
Post a Comment