Sunday 23 July 2023

तिकडंम आघाडी

विरोधी पक्षांचे महागठबंधन UPA चे नाव बदलून नवीन नाव ऐकून आश्चर्य वाटून घेवू नका, तर ते आघाडीचे नवीन नाव आहे Indian national developmental inclusive alliance (INDIA) राहुल गांधी यांच्या सुपर मेमरितून निघालेल्या या नवीन नावाचा अर्थ तरी काय आहे अजून तरी त्याचा नीटसा अर्थ उमगलेला दिसत नसला तरी बरीच मंडळी त्याचा अर्थ शोधण्यात गूगल ची पाने उलथापालट करण्यात व्यस्त असावेत. या I.N.D.I.A नाव असलेल्या गठबंधन मध्ये बरीच अशी मंडळी नेते किंवा पक्ष असे आहेत की ज्यांचे विळा भोपळ्याचे नाते आहे, कोणाचं हिंदुत्व वर जिवाआड प्रेम आहे आणि ते आता सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्यां पक्षांचे कधी आयुष्यभर एकमेकांशी पटले नाही त्यांचे एकमेकांवर एव्हढे प्रेम कसे काय दाटून आले! या कोड्याचे उत्तर अतिशय सोपे आहे ते सांगायची गरज वाटत नाही. श्रीयुत अनय जोगळेकर यांची मी आज एक यूट्यूब पहिली, ही चर्चा चालू असताना त्यांना एक सुंदर गोष्ट आठवली. ते मजेशीर वर्णन करून सांगतात. एक नवरा बायको असतात, दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. नवरा असतो त्याने हातावर एक घड्याळ बांधलेलं असतं. (राष्ट्रवादीचं नव्हे) पण एक घड्याळ बांधलेलं असतं. ते घड्याळ बांधलेलं असलं तरी त्या घड्याळाचा पट्टा तुटलेला असतो. (ही शिवसेनेची गोष्ट आहे असं समजू नका कारण ही खूप खूप जुनी गोष्ट आहे.) त्याचा घड्याळाचा पट्टा तुटलेला असतो, त्याची पत्नी सुंदर असते. तिला लांबसडक केस असतात. पण ते बांधायला तिच्याजवळ पिन किंवा क्लिप नसते. त्यामुळे त्या बिचारीला आपले केस मोकळे ठेवावे लागत असतात. नवऱ्या बिचाऱ्याला वाईट वाटत असतं की आपण गरीब आहोत, आपण बायकोला केस बांधायला साधी क्लिप ही आणून देवू शकत नाही. बायकोलाही वाईट वाटत असतं की आपल्या नवऱ्याचा घड्याळाचा पट्टा तुटला आहे तो पट्टा ही आपण बदलून देत नाही. दोघांचं प्रेम ही एव्हढ, एक दिवस काय होतं तर त्याची बायको तिचे लांबसडक केस कापून टाकते आणि विग वगैरे जे बनवतात त्यांना ते केस अर्पण करते. त्याचे जे पैसे येतात त्यातून ती नवऱ्याच्या घड्याळासाठी पट्टा विकत घेते. नवरा काय करतो, घड्याळाचा पट्टा तुटलेला आहे, घड्याळ असही काही उपयोगाचं नाही . नवरा विचार करतो की निदान आपल्या बायकोला चांगली क्लिप तरी घेता येईल, म्हणून तो आपले घड्याळ विकून टाकतो आणि बायकोसाठी क्लिप घेतो. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की नवरा बायकोचे एकमेकांवर किती प्रेम आहे. शेवटी तात्पर्य काय तर दोघांचे एकमेकांवर प्रेम असुनही नवऱ्याचं घड्याळ ही जातं आणि बायकोचे केस ही कापले जातात. शेवटी राहतो तो पट्टा आणि क्लिप चं करायचं काय ? आघाडीतील विविध पात्रे एकाच टांग्यात दाटीवाटीने येवून बसलीत आणि घोडा घाससे दोस्ती नही करेगा तो खायेगा क्या ? उसको खाली पेट सोना पडेगा. मतदाराला ही पूर्वा अनुभवानुसार चांगले माहीत आहे की असली सरकारे देश चालवू शकत नाहीत.

No comments:

Post a Comment