पूर्वीच्या काळी घोड्यांच्या टापावरून राजकुमारीला कळत असे की, तिच्या स्वप्नातला राजकुमार राजवाड्याच्या दिशेने येत आहे. परंतु तो काळ आता राहिलेला नाही. मोबाईलच्या रिंग टोन वरून तिला सर्व काही कळून चुकतं की तिचा राजकुमार कोणत्या लोकेशनला आहे. आजचं विज्ञान युगात नवनवीन शोध लागून सॅटेलाइटच्या अचाट शक्ती दर्शन झाल्यावर गर गरायला होतं. हो जमाना खरंच बदलला आहे. परंतु ऋतू बदललेले नाहीत. कूस बदलावी तसे ऋतू पलटतात. सण, व्रत वैकल्ये हे ऋतु नुसारच ओळीने येतात आणि या मॉडर्न जमान्यात यांच्यावरचा विश्वास दुरावत चाललेला आहे हे मात्र खरे.
परंतु आपली हिंदू संस्कृती ही सण, व्रत, मांगल्य, रीती रिवाज ने काठो काठ भरलेली आहे. प्रत्येक सणाची मांडणी अतिशय सूष्मपणे कल्पकतेने केली गेलेली आहे. रामायण महाभारतापासून या सण रुढींचे मूल्य जपले गेलेले आहे. भारतीय संस्कृतीची उज्वल परंपरा टिकवून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. वट पौर्णिमेच्या व्रताचं महत्व ही तसंच अगाध आहे. सावित्री आपल्या पतीचे प्राण वापस मागण्यासाठी यमाचा पाठलाग करते. केवढं विलक्षण इच्छाशक्ती त्यावेळी सावित्रीने प्रगट केली होती.
आकाशात नुकतेच पांढरे ढग गायब होवून काळे ढग गर्दी करू लागतात. शेतात शेतकऱ्यांची नांगरणी, वखरणी होवून शेतकरी बी पेहरणी साठी सज्ज झालेला असतो. जेमतेम पावसाला सुरुवात होते न होते तोच वट पौर्णिमेची चाहूल लागते. हा सण तसा एक दिवसाचा. स्रिया नटून थटून शृंगार करून वडाला फेऱ्या मारून व धाग्यांनी बंधनात बांधून आर्जव करतात की सात जन्मी हाच पती मिळो. ती आपल्या आशा, अपेक्षा, प्रितीच्या कोमल भावना, संवेदना, तन, मन धन सर्व काही समर्पित करून आपल्या पतीबद्दल सुयश चिंतितते.
परंतु वट पौर्णिमेची चाहूल लागताच हल्ली चाणाक्ष पुरुष नाही ते आपले अचाट बुद्धीचे कौशल्य पणाला लावून वट पौर्णिमेचं व्रत हे योग्य कि अयोग्य या कूट प्रश्नांची मांडणी करतात आणि सणासुदी आंब्याची डहाळी सहज मोडून आपल्या घराला तोरणं बांधायचे मात्र विसरतात. हा सण जवळ आला म्हणजे ह्या पिढीतल्या पुरुषांच्या मनात वट पौर्णिमे बद्दल बरीच खलबते सुरु होतात. आपण पण या पिढीतलेच. मग ब्रम्हदेवाने आपल्यात कुठलं नवीन रसायन ओतलं असेल ! दसऱ्याला हिरवं सोनं लुटलं जातं, पोळा या सणाला बैलांना पुरण पोळी खावू घातली जाते. गुढी पाडव्याला कडू निंबाची डहाळी बांधून गुढी उभारली जाते, दसरा दिवाळी या सणाला हिरवे तोरणं बांधल्या शिवाय त्या दिवसाची सुरुवातच होत नाही. हे सर्व पावित्र्य मांगल्याचे भान हरपून वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर कोणी अंध श्रद्धेवर बोलायला लागतो तर काही जण थोडे पुढे जावून त्याच्यावर संशोधन करून शास्त्रीय कारण शोधण्याचा प्रयत्न करतात. ह्या सर्वच गोष्टी तराजू मध्ये तोलता येत नाही म्हणून बरं, नाही तर गटार अमावस्येला माणसाची बुद्धिमत्ता खरोखर किलोने विकली गेली असती !
पुरुषांचा जवळ जवळ नव्व्यांणवं टक्के सहभाग नसलेल्या या वट पौर्णिमेच्या सणात पुरुष हा देव असतो. पतीचे सारे दोष विसरून त्याच्या दिर्घ आयुष्यासाठी आणि जन्मो जन्मी हाच पती मिळण्यासाठी ती वट पौर्णिमेंचं व्रत दर वर्षी नित्य नियमाने करत असते. भारतीय स्त्री ने हा सांस्कृतिक मूल्याचा ठेवा सावित्रीच्या काळापासून तिला मिळालेल्या आयुष्याच्या महावस्त्रात घट्ट बांधून ठेवलेला आहे. ही गाठ सोडविण्याचा आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केला. परंतु त्यांना आतापर्यंत यश लाभलेले नाही. सती सावित्री ह्याच भूमीत महाभारतात वन पर्वतात भेटते. आणि तेथून ही प्रथा सुरू झाली असे आपणास वाचावयास मिळते.
विवाहात स्त्रीची तिच्या पतीबरोबर जन्माची गाठ बांधली जाते. तसं बघितलं तर कुंकू हे स्त्रीच्या सौभाग्याचं लेणं. देवीच्या दर्शनाला जाते तेंव्हा देवीच्या साक्षीने शेरभर कुंकू खरेदी करते. कुंकुवात तिचा आयुष्यभर जीव अडकलेला असतो. ती पुरुषाच्या आयुष्यात चैत्र पालवी सारखी येते. निसर्गात वसंत जसा बहरतो तशी ती आपल्या संसारात बहरते आणि विनयशील सौंदर्य बहाल करते म्हणून तर स्त्री ही पुरुषाची आदिम प्रेरणा आहे. अश्या प्रकारे ती घराचा स्वर्ग बनविते. याच्याही पुढे जाऊन तिला वाटते की मला जन्मो जन्मी हाच पती मिळो. याच्यापेक्षा पुरुषाला मिळणारी आदिम प्रेरणा कोणती असेल. पुरुषाने तिची भावना, कोमलता आणि प्रसन्नता जपली पाहिजे. कविवर्य सुरेश भट यांनी त्यांच्या कवितेत म्हटलं आहे. मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो । तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. म्हणूनच तर....वट पौर्णिमा...आहे मनोहर तरी, हे सुभाषित वापरण्याचा मोह टाळता आला नाही.
"आहे मनोहर तरी" हे सुभाषित नसून ते पद्मश्री पु.ल.देशपांडे यांची पत्नी सुनीता देशपांडें यांचं पु.लं. चं मागोवा घेणारे पहिलं अजरामर झालेलं पुस्तकाचं नांव आहे, या सुवर्ण अक्षरांची आठवण झाली आणि वट पौर्णिमा आहे मनोहर तरी...झाली.

No comments:
Post a Comment