राफेल विमान खरेदीत केंद्र सरकारला क्लीन चिट
राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचाराचा आरोप करणारे राहुल गांधी यांना जनतेने लोकसभा 2019 च्या मतदानद्वारे चांगलीच चपराक दिली आहे. त्यामुळे त्यांना परत माफी मागायला लावणे म्हणजे जनतेपर्यंत आवाज पोहचविणे असा अर्थ होतो. कारण आपल्या देशात जनता अशी एक न्यायालय आहे की सुप्रिम कोर्टाचा निर्णय यायच्या अगोदरच जनता व्होटींग द्वारे न्याय देवून मोकळी होते. राहुल गांधींचं वक्तव्य "देशका चौकीदार चोर है" असा युंक्तीवाद किती फालतू आणि हीन दर्जाचा होता हे जनतेला मुळीच आवडले नव्हते. विशेष म्हणजे बुद्धीवाद्यांनाही त्यावेळेस बुद्धिभ्रंश झाला होता की काय, त्यांनीही या वक्तव्याविरुद्ध गिलिमिळी चूप केली. शोभेसाठी वापरात येणारे पतंगाचे रंगीबेरंगी कागद किती तकलादू असतात हे न्यायालया द्वारे पुन्हा एकवेळा सिद्ध झाले. लोकशाहीचा धागा उलगडून बघितला तर सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखविणे हे विरोधी पक्षाचे धोरण असुच शकत नाही, पण पण सर्वच विरोधी पक्ष हे सारासार विसरून सरकारच्या चांगल्या गोष्टींना विरोध करण्यातच धन्यता मानत असतो. लोकशाहीची अशी जहरी विषवल्ली जनता छाटून टाकते.
तुकाराम गाथा .....
मुखें सांगे भ्रमकथान । जन लोकाची कापितो मान॥1॥
असत्य सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी ॥ध्रु.॥
कथा करितो ज्ञानाची । अंतरीं आशा बहु लोभाची ॥2॥
तुका ह्मणे तो चि वेडा। त्याचें बहू उद्देश हाणावा ॥3॥
अमर्याद अशी गणितातली संख्या ज्यांनी वाचली नसेल, त्यांनी घोटाळ्यांची फिगर इन रुपीज वाचून बघावी. असे हे महा प्रचंड घोटाळ्यांना सुद्धा क्लीन चिट मिळविण्यासाठी का कोणी प्रयत्न केले नाहीत, जनता मात्र अजून विसरलेली नाही. शतके नी शतके निघून जातील परंतु याची उत्तरे मिळणार नाहीत

No comments:
Post a Comment