महाराष्ट्रात शेवटी पोरखेळ संपला एकदाचा, पोरखेळ संपलाअसला तरी खरा खेळ आता रंगात येणार आहे. कोणी कोणाच्या मुसक्या आवळल्या, कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला. कोणाच्या नाड्या कोणाच्या हातात आहेत, कोणी कोणाची शपथ घेतली. कोणी माईंड गेम केला, आणि कोण आयजीच्या जीवावर बायजी उदार झाला. कोणी कोणाला मित्रता तोडण्यास भाग पाडले आणि कोणी स्वतःच्या हाताने आपले परतीचे दोर कापून घेतलेत. भरपूर प्रश्न डोक्यात घोंगावत असतील परंतु आता शांत राहणे गरजेचे आहे कारण उद्या तारीख 28 नोव्हेंबर 2019 रोजी शिवसेने तर्फे मुख्यमंत्री शपथ घेत आहेत. प्रचंड मतभिन्नता असलेले सरकार उदयास येत आहे, की ज्यांनी जिभेच्या तलवारीने एकमेकांवर सपासप वॉर केले होते, ते आता एकत्र एका ताटात जेवणार आहेत. सरोवर किचड रहित हो तो ओ शोभा देता है, हे सुद्धा तितकेच खरे आहे. काहींना वाटतं खेळ संपला, पण राजकारणात खेळ कधीच संपत नाही. एक संपला की दुसरा सुरू होतो. जो पर्यंत खेळ आणि खेळाडू आहेत तो पर्यंत सामना होणारच. जनता मात्र आपला मतदानाचा हक्क बजावीत असते. एकदा दिलेले मत त्याला परत घेता येत नाही आणि मत परत घेण्यासाठी तसा कायदाही अस्तिवात नाही. सुरुवातीलाच महा शिव विकास आघाडीतील शिवसेनेने शिव हा शब्द गमावला. शिवसेनेने काय कमावलं आणि काय गमावलं हे रोज आपणास वर्तमान पेपरात वाचावयास मिळेल आणि येणारा काळ देखील सांगेल, त्यावेळेस सर्व्हे करण्यासाठी मिडियावाल्यांची गरज नसेल.
No comments:
Post a Comment