बायको दूध घ्यायला गेली आणि येतांना मांजर आडवी गेली. या रांडेला आताच आडवी जायचं होतं का. मागे फिरून पण जाता येत नाही कारण दुधाचा थेंब घरात नव्हता आणि चहा पिल्याशिवाय दिवसाच्या कामाला सुरुवात होणार नव्हती. दूध तापवायला गॅसवर ठेवलं आणि खरोखर ते उतू गेलं याला कसला योगायोग म्हणायचा. तेवढ्यात माजघरातून आवाज आला, तुझ्या हातून नेहमी असं होतंच कसं, लक्ष असतं कुठे तुझं सध्या. असा कितीही ठणठणाट करून झाल्यानंतर सासूबाईंनी दुधाचा फेसाळलेला ओटा साफ केला असं कुठेही वाचण्यात अजून तरी आलेलं नाही. मांजर आडवी गेली तेंव्हाच तिला सिग्नल मिळाला होता आणि आजकाल माझ्या हातून जास्तच मीठ पडायला लागलं, देव जाणे सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं होतं असा किदरलेला आवाज घराघरातून ऐकू येत असतो. आणि दुसऱ्या दिवशी भाजी करपून गेल्यावर आपलं चित्त ठिकाणावर नाही असं उगीच बोलणं खावं लागणार या भीतीने घरातली सवाशिणीन बिचारी चिडीचूप असते. रात्रीचे साडे नऊ वाजले आहेत, बाई आता जेवणावळ्या तयार करायला घेते. पण दुष्काळातला तेरावा महिना अजून कसोटी घेण्यासाठी आसुसलेला असतो. पहिला घास तोंडात टाकणार तेवढ्यात लाईट गेलीच समजा. खरं आहे, कोंबडा बिचारा सकाळी सकाळी अरवण्याचं काम करून मानव जातीवर अनंत उपकार करतो, पण त्याला उदंड आयुष्य लाभो असा कोणीही आशीर्वाद देत नाही हेच खरं.
सोमवार, १० डिसेंबर, २०१८
सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८
सांडितो अवगुण रे भ्रमरा !
उष्ण कटिबंधातले वाहणारे वारे एखादे वेळेस तुम्हाला शिथिल आढळतील, परंतु हिवाळी मोसमाचा गारवा असून देखील सुद्धा , भारतात सध्या निवडणुकीचे विषम आणि उष्ण वारे वाहत आहेत. आणि राजकारणातला दूषित घनकचरा इतका उफाळून वर आला आहे की सध्याचं सर्व वातावरणच प्रदूषित झालं आहे. कोणी कोणावर कसेही हीन दर्जाचे आरोप करत सुटला आहे. ह्या दुषीत घनकाचाऱ्याला जाळण्यासाठी कायद्याची कुठलीही चौकट अस्तित्वात नाही. म्हणून व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली या लोकांनी चांगलेच अवडंबर माजविले आहे. याच्यात न्युज पेपर आणि मेडिया वाल्यांनी सुद्धा काही प्रमाणात आगीत तेल ओतण्याचं काम प्रामाणिक पणे करीत आहेत. गोळ्या नसलेल्या बंदुकीचे फुसके बार उडविण्याचे जनक म्हणून क्रेडिट आप पक्षाचा म्होरक्याकडे जाते. कोणताही हातात पुरावा नसतांना करोडो रुपये भ्रष्टाचार केलेल्या पंधरा ते वीस लोकांची लिस्ट जाहीर करणे, हा त्यांचा हातखंडा झाला होता. पण त्यांना एकालाही दोषी सिद्ध करता आलं नाही . पण अण्णा हजारेंच्या चळवळीत सामील होऊन दिल्लीत दुकान थाटून बसले हे मात्र खरे. त्याप्रमाणे आपल्या पक्षालाही देशाच्या मध्यभागी दिल्लीत चौकीदाराची नोकरी मिळावी म्हणून काँग्रेसपक्षपती यांनी रोज पंतप्रधानांवर फुसके बार फोडण्याचे अजब शस्त्र शोधून काढलं आहे. काँग्रेस पक्षाच्या साठ वर्षांच्या राजकिर्दीत असंख्य करोडो रुपयांचे महा घोटाळे झालेत हे जनता विसरली असेल असं त्यांना वाटतंय. साठ वर्षे निर्विवाद अधिराज्य करणारा काँग्रेस पक्ष 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत चक्क 45 या आकड्यावर आपटला होता. मोदींनी विश्रांती न घेता विकासाचा ध्यास घेतला. शेतकऱ्यांची कर्जे माफ केलीत. इराणची थकित रक्कम देण्यासाठी मोदी सरकारने रणनीती, आराखडा आखला, सहा हप्त्यांमध्ये संपूर्ण ४३ हजार कोटीचं थकीत देणं भारतानं दिलं. जीएसटी आणि नोट बंदीचं धाडसी निर्णय घेण्यात आला. परिणाम असा झाला विरोधकांची दुकाने बंद झालीत, प्रत्येक रुपयामागे सरकारला कर मिळू लागला. टॅक्स रूपाने जमा झालेला पैशाने सरकारी तिजोरीत चांगलीच भर पडून जनकल्याणासाठी योजना सरकारकडून सुरू करण्यात आल्यात. वचनपूर्तीसाठी अथक प्रवास करायचा असतो तो त्यांनी या साडेचार वर्षात केला आणि आज भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. बघता बघता 2019 च्या निवडणुकीचे सर्वानाच वेध लागलेत. पण रान कधी सपंतच नाही. काळोख सुरू झाल्यावर भर अरण्यात प्रकाशित चांदण्यांची सुद्धा भीती वाटायला लागते. महापुरात सापडलेल्या ओंडक्यांना काडीचा आधार हवा असतो तशी विविध पक्षांची गत झाली. आपलं अस्तित्व जणू धोक्यात आलं आहे आणि ते टिकविण्यासाठी, नाही ते हीन दर्जाचे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. ही विकृती एवढ्या टोकाला पोहचली, की पंतप्रधानांना नाही त्या हलक्या दर्जाच्या उपाध्या विरोधकांनी दिल्यात. आणि त्यात कोणीही मागे राहिले नाही. व्यक्ती स्वातंत्र्यच्या नावाखाली अवडंबर माजवून भारतीय संस्कृतीची ऐशी की तैशी करून टाकली. शहरात ओला सुका घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक यंत्रणा सज्ज असते. परंतु राजकारणात अतिरंजित तोंडाळ राजकारणी घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे मतदारच पुढाकार घेवून अश्या प्रदूषित राजकीय दूषित घनकचाऱ्यांची मतदानाद्वारे विल्हेवाट लावू शकतात. आणि ही संधी फक्त पाच वर्षांनी एकदाच येते.
शनिवार, १० नोव्हेंबर, २०१८
शीतचंद्रलोक दिवाळी पहाट २०१८
अजून पान जागे, फुल जागे, भाव नयनी जागला
श्रीमती पेडणेकरांचे विशेष कौतुक, की ज्यांनी निवेदनाची रूपरेषा आखून दिली होती. तुमचं ज्ञान कौशल्यं चं प्रतिबिंब त्या नितळ निवेदनात दिसलं.
अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते,
खुरट्या बुंध्यावरी चढून, अजून बकरी पाला खाते.
रात्र अजून रात्रीच्या काळोखातच गुरफटलेली होती. रात्रीच्या गर्भातला लालबुंद आणि तांबूस रंगाचा गोल पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडायला बराच अवकाश होता. आकाश स्वच्छ आणि निरभ्र व्हायला जणू त्यानेच मोकळीक करून दिली होती. अन अशा भव्य मंडपाखाली, शीतचंद्रलोक सोसायटीच्या प्रांगणात एक नवीन पहाट उदयास येत होती. नवीन कपडे परिधान करून आलेल्या लेडीज, जंट्स तरुणाईची लगबग चालू झाली होती. नव युवतींनी रंगमंचकासमोर काढलेली भव्य देखणी रांगोळी लक्ष वेधून घेत होती. तुळशी वृंदावन अंगणात मध्यभागी सजले होते. स्टेजवर दिव्यांचा झगमगाट होता. आकाश कंदील नेहमी प्रमाणे तटस्थ स्टेजच्या मध्यभागी मिणमिणत्या प्रकाशात लुकलुकत होता. थोड्याच वेळात दिवाळी पहाट २०१८ चे पाचवे पुष्प गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात गुंफले जाणार होते. ज्यांनी १५७ पटकथा लिहून दोनशे पेक्षा जास्त गाण्याचा खजिना आपल्याला उपलब्ध करून दिला होता. हळू हळू काळोख्यातल्या सर्वच चांदण्या भूतलावर अवतरुन प्रज्वलित झाल्यात, एक चांदणीने मात्र दूर काळोखातच अढळपद स्वीकारलं आणि एका अनुत्तरीत प्रश्नाचं वलय निर्माण होऊन कुतूहल जागं झालं. सकाळचे साडेपाच वाजलेत, रंगमंचकावर सर्व कलाकार भारतीय बैठक मारून स्थानापन्न झालेत. उत्सुकता शिगेला पोहचली होती. पहाटे पहाटे शेतकऱ्याने गोफणीतला दगड आपल्या उभ्या पिकांवर भिरकावून, भुर्रकन उडणाऱ्या पक्ष्यांचा विहंगमय आवाज अजून तरी कुठल्याही कॅमेरात नजर कैद झाला नव्हता. आणि तेवढ्यात संगीत मानापमान नाटकातील नयन नटवरा विस्मयकारा या समूह गीताने कार्यक्रमाला दमदार सुरुवात झाली.
शांत भासणाऱ्या अथांग जलाशयाच्या पृष्ठभागावर उडणाऱ्या पक्षाच्या पंखाचा स्पर्श व्हावा आणि त्यातून निर्माण होणारी असंख्य वलये हळू हळू शांतपणे विस्तारीत जावून अदृश्य व्हावीत, त्याप्रमाणे निवेदिका मिसेस गाडगीळ यांनी एकेक गाण्यांचे पदर उलगडतांना आपल्या मृदू, शांत आणि सुमधुर आवाजाने हवेत आद्रतेची वलये निर्माण केलीत. प्रेक्षकांना भुरळ पडली ती त्यांच्या ओघवत्या भाषा शैलीवर. गाणं संपल्यानंतर पुढचं गाणं कसं गुंफलं जाणार आहे, त्या गाण्याचे बोल काय असतील आणि त्या गाण्यांचे आपल्याशी नाते ते कसे उलगडतात यांकडेच सर्व प्रेक्षक कौतुकाने त्यांच्याकडे बघत होते.
सौ समता पावसकरांनी तूच सुखहर्ता तूच दुखहर्ता हे मूळ प्रल्हाद शिंदेच्या आवाजातील गाणं गाऊन एक प्रकारे जगाच्या कल्याणासाठी देवाला साकडं घालून प्रेक्षकांची मने जिंकलीत. त्यांच्या आवाजातला कणखरपणा हा शिक्षकी पेशातून उदयाला आलेला नजराणाच होता. वाऱ्याच्या झोताने शेतातली जोंधळ्यांची ताटं पानं हलवून जशी मुजरा करतात त्याप्रमाणे प्रेक्षक या गाण्याला तल्लीन झाला.
आणि प्रेक्षकांच्या एकाग्रतेला खंड न पडू देता श्री संजय पुराणीक यांनी, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांच्या आवाजातलं नाचत नाचत गावे हे गाणं गाऊन प्रेक्षकाला ब्रम्हानंदे तल्लीन व्हायला लावलं.
आताच झिणी झिणी वाजे बीन वाजे सख्यारे हे मूळ आशा भोसलेंच्या आवाजातलं गाणं आपण त्यांच्या आवाजात ऐकलं, ज्यांनी निवेदिकेची भूमिका आजपर्यंत अगदी सहजपणे हसत खेळत पार पाडली होती, शितचंद्रलोकच्या रंग मंचकावर होणाऱ्या नाटकात आजपर्यंत बहुमूल्य योगदान त्यांनी दिलं होतं, "साजणी बाई येणार साजण माझा" ही गायलेली लावणी दिवाळी पहाट २०१५ चं एक खास आकर्षण ठरलं होतं. आणि आता असे किती बरे स्वल्पविराम देऊन पुढे जात राहिलो तर त्यांचा नांवाचा उल्लेख करायला विसरेन मी. त्या म्हणजे, श्रीमती गौरी गोठीवरेकरांना मागे वळून बघायला वेळ कुठे आहे. आज तर त्यांनी कानडी भाषेतलं भाग्यदा लक्ष्मी बरंम्मा हे भजन गाऊन आश्चर्याचा धक्काच दिला. न जाणो भविष्यात त्यांच्याकडून कोणत्या सप्तगुणांची मालिका बघायला मिळेल. आत्ताच असा खोल पाण्यातला तळ न बघितलेला बरा ! परंतु शितचंद्रलोक मधील प्रेक्षकांना समजावणार कोण !
गदिमांचं विकत घेतला शाम बाई मी, विकत घेतला शाम आणि नेसले गं बाई चंद्रकला मी ठिपक्यांची अशा सुदंर गाण्यांची निवड करून सौ साक्षी सनगरे यांनी त्यांच्या सुंदर आवाजात गाऊन प्रेक्षकांची मने जिंकलीत. त्यांच्या आवाजात गोडवा आहे.
आटपाट एक शीतचंद्रलोक नावांचं नगर होतं आणि त्या नगरात तिचा आवाज घुमतो असे म्हणतात. तर उर्वी तिचं नांव असावं. तीने ज्या स्वरात सुरेख आणि अप्रतिम असं गाणं गायलं, त्या शब्दांचा मोह मलाही आवरता आला नाही आणि चक्क मी माझ्या या अभिप्रायाला त्याच शब्दांची फुले वाहिलीत. अजुनी पान जागे, फुल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षीला. गाडगीळ साहेबांनी सुरेख साथ दिली.
सौंदर्याची उधळण तू
लई दिसाची हौस राया, चला आता पुरी करू, चला जेजुरीला जाऊ हे गाणं गाण्यासाठी एकाच या जन्मी जणू फिरुनी जन्मेन मी नव्हे तर पुढच्या वर्षी फिरुनी हीच लावणी गाईन मी. झी चोवीस तास गौरवीत सौ शोभा गावडेंना सौंदर्याची उधळण तू, नवरत्नाची खाण तू म्हणत परत एकदा वन्स मोअर होऊ द्या अशी सर्व जण आतुरतेने वाट बघत आहेत.
प्रीत लपवुनी लपेल का, लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का.श्रीयुत पुराणिक काकां, वॉ क्या बात है. जीसकी तारीफ करना भूल जाय, उससे बडी दाद और क्या हो सकती है.
मनात सुंदरा तूझीच मूर्ती श्यामला आणि २०१५ ची दिवाळी पहाटचं शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी चंद्र आहे. अशी एकाहून एक क्लासिकल गाणी आजपर्यंत आपण गायलीत. गाडगीळ साहेब, मनात सुंदरा तूझीच मूर्ती श्यामला तुम्हीच आहात.
देहाची तिजोरी, भक्तीचाची ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा हे जगदीश खेबुडकरांचं गीत सुधीर फडके यांच्या अवजातलं गाणं, काटकर साहेबानी गायलं आणि एका नवीन कलाकार गवसला. त्यांच्या गाण्यावर एवढा कमांड होतं जणू ते आपल्या माध्यमिक शाळेपासून गात असावेत. त्यांना संगीताची देखील आवड आहे असं कळलं. Very good, Excellent
श्रवण गोठीवरेकर - माळीण नाटकात झलक दाखविल्यानंतर सायन आया गाणं गातांना चेहऱ्यावरच्या छटा आणि मुरलेले हावभाव बरच काही दर्शवीत होते. आम्ही म्हणतो म्हणून नव्हे, आता तू सायनला उतरुच नको , असाच पुढे जात रहा. यशस्वीभव.
टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. हा अभंग अप्रतिम आवाजाचं लेणं लाभलेल्या नेहा आणि उर्वी यांनी सुरेख आवाजात गायला आणि शीतचंद्रोक मधील पहाट पंढरीमय झाली.
श्रीमती पेडणेकरांचे विशेष कौतुक, की ज्यांनी निवेदनाची रूपरेषा आखून दिली होती. तुमचं ज्ञान कौशल्यं चं प्रतिबिंब त्या नितळ निवेदनात दिसलं.
ज्यांना जर कधी एखादा दुर्मिळ धागा सापडला तर त्याच्यावर एक तास लेक्चर देणारे आणि ज्यांना त्यांची स्तुती केलेली अजिबात आवडत नाही ते श्रीयुत पोंक्षे साहेब आज मला थांबवूच शकत नाहीत. त्यांनी एका उत्कृष्ट गाण्याची निवड केली होती. मंगेश पाडगावकरांचं गीत, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. गाण्याचे शब्दच त्यांच्या सर्जनशीलता विषयी बोलून जातात. दिवाळी पहाटची सुंदर चकाकणारी किनार त्यांच्यामुळेच प्रकाशित झाली. परंतु हे श्रेय ते स्वतः घेत नाहीत. कोणतंही प्रिप्रेशन नसलेला कागद हातात नसतांना सर्वांचे आभार प्रदर्शन मानून काही चुकलबिकल तर क्षमा असावी असे भाव प्रगट करून कार्यक्रम वेळेत संपवतात. उद्देश साध्य झाल्यानंतर ग्रुप क्लोज सुद्धा करतात. अशा व्यक्तिमत्वाला सलाम. अध्यक्ष श्रीयुत फाटक आणि सेक्रेटरी श्रीयुत कुंभार यांनी दिलेले मोल अनमोल आहेत. श्रीयुत सनगरे यांचं विशेष कौतुक की ज्या कार्यक्रमासाठी तुळशीवृंदावन आणि आकाशकंदील चं ते वर्षभर काळजी घेतात.
दिवाळी पहटच्या निमित्ताने व्यक्तिमत्वाला सांस्कृतिक आकार देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्फुर्ती गीताने संपन्न झाला.
कितीही परिसर जलमय झाला, तरी शुभेच्छा वर्षावाचा बोर्ड वाहून जाणार नाही. कारण त्याची ओहरहेअड वायर मजबूत आहे. म्हणून बा. सी. मर्ढेकर त्यांच्या कवितेत म्हणतात,
अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते,
खुरट्या बुंध्यावरी चढून, अजून बकरी पाला खाते.
धन्यवाद
सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८
खिडकीतलं चांदणं
आपली कोणतीही गुपितं कोणालाही कळनार नाहीत असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीची खबर बात हिच्यामार्फत घेतली जावून तुमच्यावर नजर ठेवली जाते. प्रत्येक घर, हवेली, कचेरी, राजवाडा किंवा गगनचुंबी इमारतींचा आराखडा तिच्याशिवाय पूर्ण होत नाही. आकाशाला गवसणी घालणाऱ्या गगनचुंबी इमारतींना भव्य सुशोभित दरवाजे असतील भले, परंतु ही नसेल तर त्याचं रूपांतर बंद अडगळीची कोठडी असाच करावा लागेल. आणि हिच्यातूनच म्हणजे याच खिडकीच्या माध्यमातून, अर्थात कॉम्प्युटरच्या आधुनिक विंडोज मधून साऱ्या जगाचा वेध घेतला जातो.
कोणी कल्पनाही केली नसेल की पूर्ण विश्वात राज राजवाडे पासून गगनचुंबी इमारतींचे सौंदर्य खिडकी शिवाय खुलून दिसत नाही. म्हणूनच गृह रचनेच्या आराखड्यात दरवाजा इतकेतच खिडकीला सुद्धा महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. खिडकी विषयी प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल असतं. कुणाचं आणि कशासाठी तरी हळवं मन तिच्यात दडलेलं असतं. घड्याळाचा उपयोग न करता खिडकीतूनच रस्त्यावरील चहाची टपरीवर कोणकोण लोक उभे आहेत, वाण्याचं दुकान अजून उघडलं कसं नाही. दूधवाला, इस्त्रीवाला यांची दुकानं आज का बरं लवकर बंद झालीत. एरवी बहिणाबाईंच्या गार्डन पर्यंत हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत जाणारी रिक्षावाल्यांची लाईन आज सामसूम का दिसत आहे, आज रिक्षावाल्यांचा संप-बिम्प तर नाहीना, या सर्व प्रश्नांची उत्तरं या खिडकीतून व्यवस्थित मिळतात. पण खिडकीतून न बघताही भाजीची गाडी केव्हापासून येऊन तो आता जायच्या तयारीत आहे हे खिडकीतून येणारी त्याची ललकारी बायकांच्या लक्षात आलेली असते आणि म्हणून हातातला पेपर वाचायचा सोडून भाजी घ्यायला मला पळावं लागतं. एरवी नाही त्या रिकामटेकड्या गोष्टींची दखल सुद्धा या खिडकीतूनच घेतली जाते. भिंतीला कान असतात तसे खिडकीलाही डोळे असतात बरे. कोणाच्या घरी मुलगी बघण्यासाठी पाहुणे आले, तरी त्याची खबरबात आपल्या घरच्या मंडळींना या खिडकीतून पुराव्यानिशी लागतो आणि चाळीत त्याची बातमी अगदी वाऱ्यासारखी या खिडकीतून त्या खिडकी पर्यंत पोहचते. सासू कितीही चलाख आणि हुशार असली तरी तुमच्या घरातली गुपितं सुद्धा याच खिडकीतून बाहेर पसार होतात. माहेरचा कोणीतरी दिसेल आणि त्याला निरोप देऊ या इच्छेने मिनीमिनीटाला खिडकीच्या बाजूने येरझारा घालणाऱ्या सुनेच्या आशा सुद्धा याच खिडकीत जिवीत असतात.
आपण इतिहासात डोकावून बघितले तर आपल्याला आढळून येईल की गड किल्यातल्या राणी महालांच्या खिडक्या तेवढ्याच सुशोभित असायच्या जेवढे महालांचे दरवाजे. याच खिडकीत बसून राजकुमारी आपल्या स्वप्नातला राजकुमार स्वार होवून येत असलेल्या घोड्याच्या टापांचा आवाज ऐकण्यासाठी तासन तास वाट बघत असे. राजकुमार परतीच्या प्रवासाला निघाला असतांना याच खिडकीच्या पडद्या आडून त्याला प्रेमाचा इशाराही करत असे. अश्या प्रकारे राजकुमारीचं हळवं मन याच खिडकीत दडलेलं असे .शहजहानला ज्या कारागृहात बंदिस्त केले गेले होते त्या कारागृहाच्या खिडकीतूनच ताजमहालचं सौंदर्य तो रात्रंदिवस न्याहाळत असे.
पूर्वी गडकिल्ल्यांच्या तटबंदीला सुद्धा छोटया छोटया खिडक्या असायच्या, पण त्यांचा उपयोग शत्रूवर गरम तेल ओतण्यासाठी असायचा. आजच्या युगात अश्या तेल ओतीव खिडक्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजकाल राजकारणातल्या खिडक्यातून गरम गरम तेल एकमेकांच्या अंगावर रोज सर्रास ओतले जात आहे. तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी सरकारी मदतीची खिडकी असते परंतु असल्या खिडकीचे गज हे गंजून पूर्ण निकामी झालेले असतात. नोव्हेंबर 2016 च्या नोट बंदीच्या काळात बँकांच्या मागच्या खिडकीतूनच नोटा बदलल्या गेल्या असं आपण प्रत्यक्ष पाहिलं होतं.
खिडकीत बसून चहा अथवा कॉफीचा घोट घेत मस्त बाहेरचा माहोल न्याहळाने हा आनंदाचा क्षण प्रगट करण्याचा आपला आयुष्यातला एक आविष्कार असतो. अशा प्रकारे मानवी मनाच्या खीडकीतूनही भाव भावनांचे अनेक वारे वाहत असतात. कवी आणि लेखकांनी सुद्धा खिडकीला आपल्या साहित्यात मानाचं स्थान दिले आहे. लेखिका सौ शुभदा खरे, त्यांच्या दोनहजार साली लिहिलेल्या वृत्तपत्रीय लेखात खिडकीचं वर्णन करतांना म्हणतात "मध्यरात्र टळून गेली पण डोळ्यात झोपेचं नामोनिशाण नाही. येणार कशी झोप ? नुकतीच मिलर आणि बुन्सची बेहद्द रोमँटिक कादंबरी वाचून संपविली....मी लिहियतेना या टेबलावर सुद्धा चांदणं पसरलंय. खिडकी समोरच चंद्र आलाय आणि मिस्किलपणे हसत विचारतोय, काय मधुचंद्राला येणार का माझ्या घरी ! खरच रे, आपल्याला मधुचंद्राला चंद्रावर जाता आलं असतं तर किती छान झालं असतं!" खिडकी बाहेर धुंद वातावरण पसरलय ! कुसुमाग्रजांची कविता मनात बहरून येते ‘काढ सखे, गळ्यातील | तुझे चांदण्यांचे हात 'क्षितिजाच्या पलीकडे | उभे दिवसाचे दूत’

बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१८
बिना कपाशींनं उले त्याले बोन्ड म्हनू नये
*******************************
*******************************
*******************************
*********************
*******************************
________________________________________________________________

वडाचे पान पिंपळाला
● मतदारांचा मोदींवरील विश्वास ढळला...श्री मनमोहन सिंग
-- साहेबांनी असा कोणता सर्वे केला की काँग्रेसवर जनतेचा भरोसा
दिसायला लागला.
________________________________________________________________
● दिल्लीतील सीबीआय च्या मुख्यालयासमोर काँग्रेस पक्षाने राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली जंगी मोर्चा काढून पंतप्रधानांच्या विरोधात चौकीदार चोर है च्या घोषणा दिल्यात.
-- सीबीआय संस्थेतील दोन सर्वोच्च अधिकारी एकमेकांवर आरोप करत असतांना ते एकमेकांची चौकशी करू शकत नाही. म्हणून केंद्रीय दक्षता आयोगाच्या शिफारशीनुसार दोघांवर कारवाई करण्यात आली. दोघांच्या चौकशीत निपक्षपातीपणा असला पाहिजे म्हणून दोघांना तूर्त पदावरून हटवले गेले. सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याची मुदत देऊन चौकशी वर देखरेख करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करून चौकशी अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला आहे. असे असतांना राहुल गांधी आपलं लंघडं घोडं एकाच दिशेने दामटवून पंतप्रधानांवर रोज रोज खालच्या पातळीची भाषा वापरून आपल्या पैलू चे दर्शन देत आहेत.
@ अशा प्रकारे राजकारणात अतिशय घातक पायंडा पडत चालला आहे. याच्यावर वेळीच आवर नाही घातला तर पुढचं भविष्य वर्तविणे अवघड होऊन बसेल.
**************************************************************
**************************************************************
लोकशाहीचा धागा उलगडून बघितला तर सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखविणे हे विरोधी पक्षाचे धोरण असुच शकत नाही, पण आजकाल राजकारणात कोणी कोणावर कसेही मोकाट आरोप करत सुटला आहे. लेखक वि.स. खांडेकर असेच एका पुस्तकात मिश्कीलपणे सहज लिहितात. "गवताची गंजी पेटवायला वाजत गाजत मशाली आणाव्या लागत नाहीत, निष्काळजीपणाने विडी ओढणारा मूर्ख मनुष्य एका ठिणगीने ते काम करू शकतो" तशा पद्धतीने आपली राजकारणी मंडळी बिनबोभाट आरोप प्रत्यारोप करत सुटली आहे. कोणाला रॅफेल मध्ये घोटाळा वाटतो तर कोणाला भूजल पातळी खाली गेली म्हणून त्याच्यात महा घोटाळा वाटतो. आणि हे विषय घेऊन कोणी कसेही वक्तव्य करतो आहे. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय रस्त्याने आडवा बांबू घेऊन पळत सुटणे असा अर्थ होत नाही. याच्यावर काही बंधने नियम, आहेत की नाहीत. नसतील तर ते करायला हवेत.
२०१९ मध्ये पंतप्रधान मोदींची खुर्ची जाणार – शरद पवार (लोकसत्ता फेसबुक)
-- साहेबानी २०१४ मध्ये असेच भाकीत केले होते की मोदी पंतप्रधान होऊच शकत नाही. परंतु झाले उलटेच तेंव्हापासून आजतागायत मोदी पंतप्रधान आहेत.
_________________________________________________________________
जलयुक्त शिवार योजना हा राज्यातील मोठा घोटाळा आहे - महाराष्ट्र
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष श्री अशोक चव्हाण (लोकसत्ता २४.१०.२०१८)
-- अशोक चव्हाण सर्व ज्ञात आहेत, दुसऱ्याचं बघावं वाकून अन स्वतःचं बघावं झाकून
______________________________________________________________
राज्य सरकारने जाहीर केलेली दुष्काळ सदृश्यची घोषणा फसवी आणि
शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसनारी - विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे
(लोकसत्ता २४.१०.२०१८)
-- मुख्यमंत्र्यांना घोषणा करायला जेमतेम एक दिवस झाला नसेल तेवढ्यात या
महाशयांना साक्षात्कार झालाच कसा, की घोषणा फसवी आणि शेतकऱ्यांच्या
तोंडाला पाने पुसणारी आहे.
मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८
मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८
रंग पानाचा हिरवा सुकला, माझ्या कापसाला ...............!
चाळीसगांव पासून जेमतेम पंधरा किलोमीटरवर वसलेलं माझं गांव "धामणगांव". या पहिल्याच वाक्यातलं "जेमतेम" हा शब्द माझ्या गांवच्या बाबतीत खूपच अशुभ ठरला आहे. वाहतुकीसाठी चाळीसगांव ते धामणगांव रोड अतिशय ठणठणीत जरी असले तरी गावकऱ्यांसाठी सरकारची एस.टी. वाहतूक व्यवस्था जेमतेम किंवा नाही म्हटले तरी चालेल. या वर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था देखील जेमतेमच होती. मी जेंव्हा चाळीसगांव एस.टी. डेपोला धामणगांवची एस.टी. बस बंद का झाल्याची चौकशी केली , तेंव्हा त्यांनी सांगितलं की पावसाळ्यामुळे एस.टी. बंद करण्यात आली आहे. त्यांचं उत्तर ऐकून मी चकितच झालो. त्याच्या डोळ्यात निरखून बघितल्यानंतर त्याचा केविलवाणा चेहरा अधिकच आगीतून काढलेल्या मठ्ठ माठासारखा भासला. गावांत नळाला पाणी सुद्धा जेमतेम अर्धा तास आणि तेही दोन ते तीन दिवसानंतर येतं आणि त्याला पर्याय नसतो, कारण हे सर्व पावसाचे अनियमित खेळ आहेत. गावांतील काही मंडळी वर्गणी काढून सांस्कृतिक उत्सव अति उत्साहाने साजरे करतात ही चांगली बाब आहे, परंतु गांवात कमीत कमी नियमित तीन वेळा एस.टी. वाहन यायला पाहिजे, गावकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांची शाळा-कॉलेज मध्ये जाण्यासाठी सोय झाली पाहिजे असा सुध्दा प्रयत्न करायला हवा परंतु तो उत्साह दिसत नाही. ज्या मराठी शाळेत आपण शिकलो त्या मराठी शाळेची फुटलेली, घरंगळलेली कौलं, अर्धवट सताड उघड्या खिडक्या बंदिस्त धर्मशाळेसारखी वाटतात. बऱ्याच वर्षांपासून पाऊस नियमित पडत नाही म्हणून शाळा समितीला ती दुरुस्त करून घ्यावीत असे सुचले नसावे कदाचित.
माझ्या लहानपणी जिथे निसर्गाला निसर्ग भिडत होता. नदीला अथांग पूर येत होता. रान वारा पिकापीकातून शीळ घालत असे आणि जंगल ही चारही बाजूने हिरवी चादर पांघरल्यासारखी भासत असे. तसं दृश्य बऱ्याच वर्षांपासून बघितले नाही. यावर्षी पाऊस श्रावण महिन्यापासून गेला तो गेलाच. त्याला तोंड फिरवून दाखवायला सुद्धा उसंत मिळाली नाही. जेमतेम तीन ते चार वेळा तो आला आणि कौतुकाची थाप घ्यायला तो घाबरलाच. नंतर त्याने फिरून तोंडही दाखविले नाही. तरी शेतकरी अजून आतुरतेने त्याची चातकासारखी वाटच बघतच होता. मंगेश पाडगावकरांची कविता भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. दिवाळी पर्यंत शेतकऱ्यांची शेतातली लगबग थंडावली. कापसाच्या गाठीच्या गाठी शेतातून घरी यायच्या त्या नाहीशा झाल्यात. कोणी बैलजोडी विकून खांद्यावरची ओझी कमी केलीत. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार सुद्धा सरकारी पद्धतीने काम करून विलंब करतंय. कापसाच्या झाडाची पानं पानं आकसून मिटलीत. कापसाची झाडाची कच्ची कैरी वयात न येताच उन्हाने केविलवाणी झाली. दिवाळीला येणाऱ्या फुलांच्या पागळ्यांचा फुलोरा फुललाच नाही.
रंग पानाचा हिरवा सुकला,
माझ्या कापसाला..............!

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८
कसा रे तू तिन्ही जगाचा पावसाविना जगवितो आम्हां !
पोळ्यापर्यंत त्याचं कसं आलबेल चाललं होतं. हिरवी चादर अंथरावी तसा धामाणगांवचा रानोमाळ शिवार हिरवागार पहुडलेला होता. पिके टरटंराट वाढलेली होती. नुकतेच लगीन झालेल्या पोरसवादा नवी नवरीला आपल्या माहेरची ओढ लागून कधी ती माहेराला जाते आणि आईच्या कुशीत पदराखाली विसावते, तशी शेतातील पिकांमध्ये एकमेकात चढाओढ चालू होती ! आम्ही सुद्धा सहकुटुंब सहपरिवार वीर देवाचं दर्शन घेण्यासाठी धामणगांवी आलो होतो. आदल्या दिवशी नुकताच पाऊस पडून वरून देवाने शेतातली वाफ मोडून टाकली होती. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. ते हिरवेगार पीक बघून काका सुद्धा म्हणाले की आज मी अर्धा श्रीमंत झालो आहे. हे वर्ष सुख समृद्धीचे जाणार म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला दिवाळीची ओढ लागली होती. पण ताटात देवाने भलतेच वाढून ठेवले होते आणि तशी त्याने तसूभरही कल्पना लागू दिली नव्हती. टप टप अंगावरती पडती पावसाची फुले असं कविला लिहायला मोह आवरत नाही आणि त्यात मनमुराद ओलाचिंब व्हायलाही त्याला आवडतं. पण !
पण प्रत्यक्षात टप टप पडणारे पावसाचे थेंबानी यावर्षी चक्क हुलकावणी दिली होती. लहानपणी बघितलेली श्रावणातली पावसाची झडी गायब झाली होती. जंगलातून येणारे गवताचे भारे दिसत नव्हते. पोळ्यापासून पावसाने दडी मारून जशी त्याने आपली कवाडे बंद करून घेतली होती. बांधावरची खुरटे सुकलेले गवत स्वतःच हसत होते. कापसाची वयात आलेली बोन्डे निपचीत बघत होती. बहिनाबाई चौधरींची कविता स्मरून मन सुन्न झाले. बिना कपाशीन उले त्याले बोंड म्हनू नही, हरी नामा ना बोले त्याले तोंड म्हनू नही. ती बोन्ड तरी उमलणार कशी. पानं पानं झाडं झाडं करपून गेलीत. बाभळीच्या ढोलीतली पिलं तहानेने कासावलीत. शेवटी काय म्हणू देवासी ! स्वामी कसा रे तू तिन्ही जगाचा पावसाविना जगवितो आम्हांसी !
टप टप पडती चौफेर पानांवरती पहिल्या पावसाचे थेंबे !
नकोरे गरजू असा ओल्या झाल्यात माझ्या पापण्या आणि वेणीची फुले
सांग मजसी, दडी मारुनी गेला होतास कुठे तू आजवरी
वाट बघून फेकून दिली कविता तुझी त्या कोरड्या विहिरीच्या तळाशी
पानं पानं झाडं करपून गेली, बाभळीच्या ढोलीतली पिलं तहानेने कासावलीत
माजुरे बांधावरचे खुरटे गवत हसते कसे, अजून नाही समजले तुला
तुझ्याविना उमलेल कसे, कोवळे बोन्ड ते कापसाचे
चारही बाजूने खिन्न अवस्था, दुष्काळ सावटाचे
शेवटी काय म्हणू देवा तुला !

रविवार, २२ एप्रिल, २०१८
गुलाब ताजे फुलतात कसे
निवृत्तीनंतर फेकून दिलेलं इंजिन जास्तच काळवंडून गेलं. त्याचा रंग निघून पत्र्यांना गंज चढायला लागला होता. आपल्या हाताला इजा होईल म्हणून कोणी त्या गंजलेल्या पत्र्यांना हात लावायला देखील तयार होईना. अशी काहीशी अवस्था आपली देखील होत असते. तशी माझी काही प्रमाणात झाली होती. अशा परिस्थितीत प्रवासाची कुठे संधी मिळते का, कधी घराच्या बाहेर पडायला मिळेल म्हणून कुठूल्या तरी आमंत्रणाची मन तन्मयतेने वाट बघत असतं. नारळाच्या झाडावरील नारळ केंव्हा खाली पडेल सांगता येत नाही. कधी कधी तुम्ही पाठमोरं झाल्या झाल्या धपकन आवाज येतो तसं, आणि काय म्हणता, 19 एप्रिलला माझ्या गांवी धामाणगांवी जाण्याचा योग चालून आला कारण 20 तारखेचं लग्न अटेंड करायचं होतं. म्हणून मी गुढघ्याला बाशिंग बांधून पुणे भुसावळ ट्रेनचं सिनिअर सिटीझन च्या सवलतीत कल्याण ते चाळीसगांव रिसर्व्हेशन देखील केलं. डोंबिवलीहून भर उन्हातान्हात घरून अडीच वाजता निघालो. अर्धा तास कल्याण स्टेशनवर अगोदरच पोहचलो. सव्वातीन ला येणारी ट्रेन "बिस मिनीटसे देरीसे चल रही हैं" ची आकाशवाणी झाली ! आणि आली चक्क चाळीस मिनिटांनी. दुःख सांगायचं कोणाला ! एक तर सवलतीत प्रवास करतोय. 'तेरी भी चूप मेरी भी चूप'. कोंबडा बिचारा सकाळी सकाळी अरवण्याचं काम करून मानव जातीवर प्रचंड उपकार करतो, पण त्याला उदंड आयुष्य लाभो असा कोणीही आशीर्वाद देत नाही. परंतु गाडी अर्धा तास काय दोन तास जरी लेट झाली तरी तिचं तोंड भरून कौतुक करून बिचारे पॅसेंजर सुखासमाधानाने प्रवास करत असतात. खरी गंमत तर अजून पुढेच आहे. माझं रिझर्वेशन असून सुद्धा माझ्या जागेवर बसलेल्या माणसाला उठवण्यासाठी मला त्याचे पाय धरावे लागले. दुसरं काय "ये मेरा इंडिया हैं" बरं हे चालायचंच ! आपण दुसऱ्याला समजून घ्यायचं असतं. बरं किती समजून घ्यायचं त्याचंही काही मोजमाप नाही. वाशिंद रेल्वे स्टेशनवर आमची आगगाडी चक्क साईडला टाकून दिली. उपनगरीय लोकल पुढे काढण्यात आली. मनाचा थोडा जळफळाटच झाला. ही कसली पद्धत आहे बाबा रेल्वेची. अजून पंधरा मिनिटे गेलीत आणि चक्क मागची सेवाग्राम एक्सप्रेस पुढे काढण्यात आली. अजून पंधरा मिनिटांनी दुसरी कोणतीतरी गाडी पास झाली. आता मनाचा ताबा सुटून रेल्वे अधिकाऱ्यांवर माझ्या तोंडून आगपाखड सुरु झाली होती. खरं म्हणजे या संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारून चौकशी व्हायलाच पाहिजे. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण. हेच आपलं चुकतं. माझा तिळपापड झालेला बघून समोरच्या बेंचवर बसलेली ताई मला म्हणालीच. बाबा जाऊद्याना, तुमची कुठं तान्हुली लेकरं वाट बघताहेत, घ्या काकडी खावा. खूप थंड असते. माझ्या चेहऱ्यावरच्या कळ्या खुलून, लुप्त झालेल्या हसऱ्या पेशी गालावरच्या खळीत सामावल्या. प्रत्येक जण एन्जॉय करत होते. गाडी एवढी लेट झाली तरी सर्व पॅसेंजर शांत आणि आनंदित कसे. कोणताही राग रोष टीका टिपण्या नव्हत्या. किती सहिष्णुता, सर्जनशीलता आणि सहनशीलता आहे या लोकांच्या मर्यादेत. गुलाब ताजे फुलतात तरी कसे याचं उत्तर मिळालं होतं मला. किरकोळ विक्रेते, चायवाले चालत्या गाडीत फेऱ्या मारत होते. परंतु अंधाऱ्या रात्री मला फाट्यावरून चालत धामणगांवी चालत जावं लागणार होतं. त्या भागात बिबट्याचा वावर आहे असं ऐकायला मिळालं होतं. म्हणून घबराहट जाणवत होती. अगोदरच दीड तास लेट झालेली गाडी आता कसारा घाटात धावत होती. आणि तेवढ्यात तिशीतल्या तरुण मुलीने गाडीची चेन खेचली. झालाना दुष्काळात तेरावा महीना. माझ्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडलेत. एका मिनिटात गाडी जागेवरच थांबली. बरेच पॅसेंजर खाली उतरले. आता पंचनामा होऊन अर्धा तास तरी जाणार अशी खात्री झाली. त्या मुलीचा खिडकीतून मोबाईल पडला म्हणून तिने चेन खेचली होती. ही बातमी वाऱ्यासारखी पोहचली. गाडी लेट होण्यासाठी होत्या नव्हत्या साऱ्या पॉसीबल गोष्टी आजच घडत होत्या. बहुतेक नियतीचाच हा खेळ असावा. म्हणून शांत राहणेच योग्य होते. केअर टेकर आला आणि निघून गेला. त्या मुलीची कोणतीही चौकशी अथवा दंड तिला झाला नाही. गाडी लवकरच चालू झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला. मला घेण्यासाठी सुद्धा माझा पुतण्या आला होता आणि मी रात्री अकराच्या सुमारास सुखरूप घरी पोहोचलो. माणसाने संयम शील असावं, आणि विपरीत परिस्थितीत आयुष्याचा आनंद लुटावा. गुलाब ताजे आपोआपच फुलतात.
रविवार, १ एप्रिल, २०१८
एप्रिल नांवाच फूल
जगात लोकांना मूर्ख बनविणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यांचा सर्वे करता येत नाही म्हणून बरं ! नाहीतर त्या आकडेवारीत कदाचित तुमची आमची ही गणना झाली असती. दुसरी गोष्ट म्हणजे मूर्ख बनविणाऱ्यांच्या दुधात साखर आणून सोडली आहे ती वर्षातून एकदा येणाऱ्या एक एप्रिलने. परंतु खरं सांगायचं म्हणजे एक एप्रिल हा सुज्ञांनी सुज्ञ लोकांना मूरख बनविण्याचा दिवस आहे. पूर्वी न्युज पेपरवाले सुध्दा मोठमोठ्या सिलेब्रिटींचे एप्रिल फूलच्या नांवाखाली लग्न लावून देत असत आणि आम्ही मोठ्या कौतुकाने आणि आश्चर्यचकित नजरेने दोन दोन वेळा तो पेपर वाचत असू. परंतु वर्षातून एक दिवस का होईना आयष्यभर मूर्ख बनविण्याचा पेशा करणार्यांना एक दिवस सज्जनतेची गुढी ऊभारता येते असो.
गोष्ट अशी आहे की, एप्रिलफूल नाही हो ! मनापासून खरं सांगतो. माझ्या मुलीचा मुलगा सोनू याचा बर्थडे दिवस सुद्धा एक एप्रिलच आहे. आता आली की पंचाईत ! त्याला कळायला लागल्यापासून जेंव्हा शाळेत त्याने बर्थडेच्या दिवशी चॉकलेट्स वाटले त्यावेळेस हा सोनू आपल्याला एप्रिल फूल बनवितो आहे अशी सर्व स्टुडंटची खात्री झाली होती. मग शेवटी शाळेच्या बाईंनी आपलं कौशल्य वापरून हा तिढा सोडविला म्हणे. असेल कदाचित. परंतु दर वर्षी त्याच्या आई वडीलांना कमी अधिक प्रमाणात लोंकाची, नविन रिश्तेदारांची समजूत काढावीच लागते.
पण एक एप्रिलफूल ने असं काही बस्तान बसवलं आहे की सकाळी सकाळी कोणतीही बातमी खरी वाटच नाही. 31 तारखेला नोकरीची ऑर्डर हातात पडल्या पडल्या विश्वास दुसरया दिवशी शेजारीण काकूंना नोकरी मिळाल्याची खबरबात देतो तेंव्हा निमा काकूंना खर वाटेल तेंव्हा ना ! आज एक एप्रिल आहे ना, दिवसभर पोरींच्या मागे हुंदडत असतो, अन म्हणे नोकरी ची ऑर्डर मिळाली त्याला !! असे कॉमेंट्स सहज ऐकायला मिळतात.
तसच आज मला एके ठिकाणचं साखरपुड्याचं आमंत्रण मिळालं आणि माझ्या मनात पाल चुकचुकलीच. आमंत्रण देणारे मुलाचे वडीलच, प्रतिष्ठित माझे नातेवाईक होते म्हणून बरं नाही तर माझाही गोंधळ उडाला असता.
तसं बरं झालं महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती एक एप्रिलला केली नाही म्हणून ठीक, म्हणून विरोधकांना भांडता तरी येतं. यांच्यातली खरी गोम म्हणजे शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती ही एप्रिल फूल होती का अशी शंका आता घर करू लागली आहे.
आपण किती तरी अनावश्यक असे पाश्चात्य देशांचे डेज मोठ्या अनंदाने साजरे करतो आणि आपल्याच भाद्रपद महिन्यावर टीकास्त्र सोडत असतो.
सोमवार, १९ मार्च, २०१८
निसटलेले
![]() |
मचल मचलके ये हवाये बुला रही है तूम्हे |
रविवार, ११ मार्च, २०१८
बांबूच्या बनात
वेळूच्या झाडाला कधी फुले येत नाहीत. परंतु निसर्गाने याच जन्मात त्या झाडाला परतावा दिलेला आहे. झाड नष्ट व्हावयाच्या अगोदर ते फुलांनी बहरून येते हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल. शास्त्रीय कारण काहीही असो, परंतु मनुष्य असल्या सद्गुणांनी कमी जास्त अधिक प्रमाणात नखशिखान्त ओतप्रोत भरलेला आहे हे नक्की.
तरुण मुले आणि मुली यांच्यात फरक एवढाच आहे की, तरुणांना बियरच्या बाटलीचं झाकण कसं उघडायचं याचं प्रशिक्षण जसं कुठंही घ्यावं लागतं नाही, त्याप्रमाणे पारंपारिक आणि अपारंपारिक उत्सव साजरे करण्यासाठी भर रस्त्यावर बांबू गाडण्याचे ज्ञान सुद्धा त्यांना सहजगत्या प्राप्त होतं. परंतु तरुण मुलीला पोळीची कणिक सैल किंवा घट्ट कशी मळायची हे मात्र तिला आईच्या शेजारीच उभं राहूनच शिकावं लागतं.
तसं म्हटलं तर रानटी झाडांचे सोयरसुतक नसलेल्या कवी लेखकांची प्रतिभा सुद्धा ह्याच बांबूच्या स्टेजवर वृक्ष वेलींचं कौतुक करण्यासाठी बहरते आणि याच स्टेजवर मंत्री महोदय सुद्धा मोठमोठी रस्ते महामार्ग बांधण्याचं सूतोवात करून तोंडभरून स्वतःचं कौतुक करून घेतात. आयुष्यभर बांबूच्या बनात वावरताना शेवटी बांबू हेच मानवाला समशान भूमीकडे नेण्याचे काम दिन रात अव्याहतपणे करत असतात. परंतु खेडोपाडी, गावो गांवी असलेल्या स्मशान भूमीला जाणारा रस्ता सुशोभित असावा आणि तेथेही पाण्याचा नळ असावा असे कोणत्याही मंत्र्यांच्या गांवी नसते. जिकडे तिकडे बांबूचं बन असतं. महिला दिनाचा पुरस्कार करणारा पुरुष सुद्धा एक दिवसापूरताच असतो. बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस वैकुंठ भूमीला कुंपण का असावं या चर्चेचं गुऱ्हाळ मांडण्यातच तो व्यस्त असतो. कोणतेही न्यूज चॅनेल लावून बघा, अश्या बरेच बांबूचे बन आपल्याला पेटलेले दिसतील.
सोमवार, ५ मार्च, २०१८
नाना
अजुनी येतो वास फुलांना अजुनी माती लाल चमकते । खुरट्या बुंधावरी चढूनं अजुनी बकरी पाला खाते ।
बा.सी. मर्ढेकरांच्या या ओळी मला त्या विश्वात परत परत खेचून नेतात. कारण लहानपणी मी ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो, रुळलो, वागलो, माझ्या बालपणाचं आयुष्य काढलं आणि ज्याने माझा प्रत्येक हट्ट पूर्ण केला ते माझे नाना, नव्हे माझे दैवतच. अजून त्या माझ्या गांवी राहत आहेत. नात्याने ते माझे काका जरी असले तरी काका हा शब्द अजून पर्यंत माझ्या ओठावर कधी आला नाही आणि आजतागायत "नाना" म्हणूनच मी त्यांना हाक मारतो. बालपणाचा प्रत्येक क्षण मी त्यांच्या सहवासात घालविला. माझे दोन्ही पाय त्यांच्या मानेच्या बाजूला सोडून त्यांच्या खांद्यावर बसून मी प्रवास करत असे. कधी बैल गाडीवर बसून, गर्द रानातून चाकोरीबद्ध खडबडीत रस्त्याने राजमाने या शेजारील गांवच्या खंडोबाच्या यात्रेला जात असू. म्हणूनच मुबंई शहरात वास्तव्याला असून सुद्धा अजून मला बैल गाडी चालविण्याचं कसब माझ्या अंगी मौजुद आहे ते यामुळेच. मला आठवतंय, भाकर बांधून चांदण्या रात्री, बैलांच्या गळ्यातील घुंगर माळांची गाज ऐकत, शेतमळ्यावर राखण करायला झोपायला जात असू, कधी कधी शेतमळ्यावरून परस्पर कोणाला चाहूल न लागू देता रातोरात शेजारच्या बाजारपेठेच्या गांवी तमाशाला जाण्याची मजा काही अलंगच होती, परंतु सूर्य नारायणाचे दर्शन व्हावयाच्या आत त्यांचे शेत मळ्यावरील खळ्यात शेताच्या बांधावर गवत कापण्याचे नाही तर मोटेवरून पाणी भरण्याचे काम चालू झालेले असायचे. मी चार पायी खाटेवरच्या अंथरुणात पडल्या पडल्या ही सारी गंमत बघत असे. त्याच क्षणी एक विहंगमय दृश्य नजरेस पडायचं. सकाळच्या प्रहरी टेकड्यांच्या पलिकडून लालबुंद आणि तांबूस रंगाचा गोल मुंगीच्या पावलासारखा तर तर चालत पृथ्वीच्या पोटातून वर येतांना दिसायचा, जणू वसुंधरेने बाळाला जन्म दिला.
सकाळच्या सौंदर्याने ओतपोत भरलेलं ते माझं गांव धामणगांव आणि ते माझे नाना अजून गांवी त्या मातीच्या घरात राहतात. अजून असं वाटतं ते लहानपण परत एकदा यावं आणि त्यांच्या खांद्यावर दोन्ही पाय आजूबाजूला टाकून, त्यांच्या डोक्यातली टोपी माझ्या डोक्यात घालून त्यांचे केस विचके-वाचके करून टाकून त्यांच्या खांद्यावर ठाण मांडून बसावे. किती दिवस झालेत रात्रीच्याला त्यांच्या बरोबर शेतावर नाही गेलो, रात्रीच्याला परस्पर चाहूल न लागू देता त्यांच्याबरोबर तमाशा बघायला नाही गेलो. ते सकाळी सकाळी मोटेवरचं पाणी, शेताच्या बांधावरचं गवत कापणं, तो लालबुंद सकाळचा सूर्यगोल मनातून पुढे सरकतच नाही. म्हणून अजुनी येतो वास फुलांना अजुनी माती लाल चमकते । खुरट्या बुंधावरी चढूनं अजुनी बकरी पाला खाते ।

शनिवार, ३ मार्च, २०१८
किलबिल कोवळी मने
मुलं ही देवाघरची फुलं असतात. त्यांची मनं निर्व्याज्य असतात. चिखलात उमलल्या स्वच्छ कमळांच्या पाकळ्यांसारखी. फुल उमलायच्या अगोदर त्या निर्व्याज्य नाजूक कळ्यांकडे बघा, कशी हात लावताच ती गळून पडतात. त्यामुळे त्यांना झाडावरून तोडायचं नसतं. त्यांना झाडावरच फुलू द्यायचं असतं. आपण नुसते डोळे जरी वटारले तर त्यांच्या नाजूक पापण्या चिंब भिजतात. तृणांच्या पात्यांवर दवाने थब थबून गेलेल्या दवबिंदूसारखी त्यांची मने कधी ओथंबून विरघळतील हे त्या मातेशिवाय कोणालाच कळत नाही. मी ज्यावेळेस तिला विचारलं, कि तुम्ही लहान मुलं पायात बूट का घालतात. "पायमोजे खराब होवू नयेत म्हणून" असं तिने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं. या नाजूक, कोवळ्या किलबिल मनाच्या भावना , त्यांनी दिलेली उत्तरे ही तितकीच कोमल पिंजलेल्या कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि परिपक्व असतात. नितळ आणि निर्मळ पाण्यात खडा टाकून त्या नाजूक लहरी निवळेपर्यंत ती कोवळी मने असच तास न तास आपलं प्रतिबिंब बघत राहतात. त्यांच्या अदा बघा किती सुंदर असतात. रीम झिम पावसात पायाने पाणी तुडविणे, साबणाच्या पाण्याचे बुडबुडे हवेत सोडणे, मोठया माणसाचे बुट पायात घालून चालण्याचा प्रयत्न करणे, बाबांचा चष्मा काढून आपल्या स्वतःच्या डोळ्यावर चढविणे, लग्नात नवरदेवाचा घोडाच पाहिजे असा हट्ट करणे, आईच्या शेजारी उभे राहून छोटया छोटया पोळ्या तयार करणे, वाकडा तिकडा वाळूचा किल्ला तयार करणे, घरात लपंडाव खेळणे, दसरा असो किंवा मकर संक्रात असो, सोनं आणि तिळगुळ घरोघरी जावून यांना कसलां कमालीचा आनंद होतोय. मांजराचं आणि कुत्र्याचं पिलांशी यांची चांगलीच गट्टी जमते.
बुधवार, २८ फेब्रुवारी, २०१८
शीत-चंद्रलोक सख्यांचं वेगळेपण
एखादया कार्यक्रमाची सांगता करतांना भव्य स्टेज वरून श्रोत्यांचे आभार मानावे लागतात, आभार प्रदर्शन करण्याची संधी मिळाल्याबद्दल कमिटीला धन्यवादही द्यावे लागतात. आणि कार्यक्रमाचा एखादा भाग आवडला असेल तर कौतुक ही करावे लागते. पण आजचा कार्यक्रमाचं व्यासपीठ आणि विषय सुद्धा थोडा अलग आणि हटकेच आहे. निमित्त सत्यनारायण पूजेचं पण इथे एका विवाह सोहळ्याची सांगता करण्यासाठी शीत-चंद्रलोक सख्यांनीं न भूतो न भविष्यती असा सांस्कृतिक गलका केला. नवी नवरी श्वेता आणि गौरव तसे च वधू-वर कुटुंबियांना कपड्यांचा आहेर देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले. एका नवीन संस्कृतीचे आगळे वेगळे दर्शन घडविले. हा भावपूर्ण क्षण माझ्या मनातल्या गाभाऱ्याच्या शिंपल्यात बंदिस्त झाला.
अशा या भावपूर्ण वातावरणात शीत-चंद्रलोक सख्यां मधील एक सखी श्रीमती सुजाता पेडणेकर यांनी सर्व सख्यांच्या वतीने त्यांच्या शब्दांत नव्या नवरीचं तोंड भरून कौतुक केलं. "तोंडभरून कौतुक करणे" त्यांना कसं जमतं हे शितचंद्रलोक सख्यांव्यतिरिक्त कोणालाही आजपर्यंत माहीत नव्हतं. देवाने त्यांना बहाल केलेली ही देणगीच असावी आणि त्यांनी ती जपून ठेवली आहे. श्रीमती सुजाता पेडणेकर यांच्या शब्दात शब्दांकन केलेलं मनोगत वाचण्या साठी मॅजिकल आवाज लाभला आहे तो सौ गौरी गोठीवरेकर यांचा. दुधात साखर पडल्यानंतर चव कशी असणार. ढगांच्या फटीतून सोनेरी किरणांचा प्रकाश पडावा तसा सौ गौरी गोठीवरेकर यांनी त्यांच्या स्वरात सर्व सख्यांच्या समोर, नेहा गाडगीळ हीच्या सुवाच्च हस्तक्षरातलं, श्रीमती पेडणेकरांचं मनोगत, एक नव्हे दोन वेळा वाचून दाखवून त्यांच्या नवीन सखीला आमंत्रित केलं आणि तिच्या भावी आयुष्याच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्यात.
सखी श्वेता
"गौरव बरोबर सप्तपदी चालून चव्हाण कुटुंबाचा भाग झालीस. तुझ्या आयुष्यात अनेक नवीन नात्यांचा समावेश झाला. गौरवचे पत्नीपद, चव्हाण वहिनी आणि सरांची सून, सुवर्णाची वहिनी, कुणाची लाडकी मामी तर कुणाची काकू. यासोबत अजून एक नात्याने भर टाकली आहे, ते म्हणजे शितचंद्रलोक सख्यांचे नाते. ज्याला वयाची बंधने नाहीत."
"सख्या म्हणजे आधार, विश्वास आणि आपुलकी. सख्या म्हणजे प्रेमळ हाथ आणि शाब्बासकीची थाप."
"अशा या सख्या ग्रुपमध्ये तुझे सहर्ष स्वागत. आयुष्याच्या नवीन वाटचालीसाठी सर्व सख्यांकडून खूप खूप शुभेच्छा."
आपल्या शीत-चंद्रलोक सख्या
वैदेही गाडगीळ
मधुरा फाटक
शोभा गावडे
साधना भुवड
गौरी गोठीवरेकर
अनुश्री सुर्वे
सारिका फडतरे
दीपाली जगदाळे
कुसूम नल्ली
सविता घारगे
स्नेहल रावराणे
हेमा राव
समता पावसकर
संगीता गुरव
वंदना गुरव
ज्योती सस्ते
मनीषा काटकर
वसुधा कांडके
जागृती चौधरी
अंजली कुंभार
श्रद्धा पोंक्षे
स्वाती गावडे
हर्षदा गिड्डे
साक्षी सनगरे
नलिनी बागवे
कल्पना गायकवाड
अनन्या राणवशे
सुजाता पेडणेकर
सान्वी पेडणेकर
विजया थोरात
शीतल थोरात
ज्योती गिरकर
दक्षा गिरकर
शीतल पाटील
सरिता पाटील
पूजा घाडगे
मनिषा हेगिष्टे
सौ पोतदार
गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८
दोन रेशीम धागे
सोसायटीतील कुटुंबीयांशी माझं कोणतं जन्मो जन्मीचं नातं आहे, हे डहाळीला समजण्यासाठी कळ्यांना उमलावं लागत नाही, परंतु हे नैसर्गिक लेणं परमेश्वराने मानवाला बहाल केले असतं तर ही वेळच माझ्यावर आली नसती हे मात्र खरे, पण जेंव्हा मला हे समजलं, त्यावेळेस मी अतिशय भारावून गेलो. नवरा-नवरीचं शितचंद्रलोक मध्ये रात्री बारा वाजता आगमन होणार होतं. सोसायटीच्या गेट वर शितचंद्रलोक कुटुंबिय त्यांची आतुरतेने वाट बघत होते. वेळो वेळी, वधू वराची गाडी कुठपर्यंत पोहचली त्याचं स्टेटस विचारलं जात होतं. सर्व जेष्ठ मंडळी आणि विशेष करून शीत चंद्रलोकच्या संख्या यांनी नव वधू-वर यांचं स्वगत केलं. नवरदेव आणि नव्या सखीचं औक्षण करण्यात आलं. रांगोळ्या, लक्ष्मीची पाउले, गेट पासून ते गृह प्रवेशपर्यंत फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. गेट पासून बी विंगच्या निवसस्थानपर्यंत मंगल धून वाजवण्यात आली. त्यात दुधात साखर टाकली गौरवने. मी पुण्याच्या ग्राउंडवर बघत होतो क्रिकेट, श्वेताला पाहून पडली माझी विकेट_गौरव (मुलं काय छुपी रुस्तम असतात ना !!) तब्बल त्रेपन्न शितचंद्रलोक वासीयांनी बस मधून लग्नाला येवून वधू-वरास आशीर्वाद दिला, अन हा माझा आयुष्यातला हायेस्ट स्कोअर बघून मी कमालीचा गोंधळलो. सारेच काही अद्भुत आणि समजण्याच्या पलीकडे. किन अल्फाजोमे मैं शुक्रिया अदा करू असे राजेश खन्ना आपल्या आवडत्या फॅन बद्दल एका मुलाखती मध्ये म्हणाला होता तेंव्हा त्याची अवस्था किती केविलवाणी झाली होती हे मला आठवलं. लग्नाच्या घाई गडबडीत माझी पेन्सिल मी म्यांन करून ठेवली होती याचे मला भान राहिले नाही. म्हणून मी माझा शब्द संग्रह रिता करून बघितला परंतु गंजलेल्या कुलुपाला कोणतीच किल्ली लागायला तयार नाही हो. शेवटी आपले आभार न मानता आपल्या ऋणात राहायचे ठरवलं आणि हे ऋण मी माझ्या साहित्याच्या ब्लॉग वेब पेजवर आजीवन जतन करून ठेवणार आहे.
परंतु आज झालं काय, सकाळी सकाळी सूनबाईने आयुष्यातला पहिला वहिला गरम गरम वाफाळलेला चंहा हातात दिला आणि एक अद्भुत वातावरणाची निर्मिती झाली. काय आनंद असतो तो चहा पिण्यात. जावे त्याच्या वंशा असे म्हणतात ना तेंव्हा मला कळले. आणि त्या निमित्ताने म्यांन केलेल्या लेखणीलाही लिहिण्याचे स्फुरण मिळाले. पहिल्या दिवशी किती मजेशीर फजिती असतात ते आज अनुभवला मिळाले. बघाना, नव दाम्पत्याने पाणी गरम करण्यासाठी चक्क कळशी आणि हंडा गॅस शेगडीवर ठेवला.
आईच्या उबदार कुशीतून कधी अचानक फुलपाखरासारखं
मन मौज मस्ती करत सुटयायचं.
कधी शुभ्र झऱ्याच्या पाण्याखाली दडून राहायचं
तर कधी शुभ्र शिंपल्यात वाळूत मचून राहायचं
आज तेच मन शुभ मुहूर्ताच्या दिनी
तृणांच्या पात्यावर दवबिंदू होवून
हळूच जमीनीत विरघळलं
रविवार, २८ जानेवारी, २०१८
नवे पंख
मला आठवतो तो दिवस 31 जुलै 2015. ऑफिसात त्या दिवशी प्रत्येकजण माझ्याशी हस्तांदोलन करण्यात उत्सुक होता. कारण त्या दिवशी मी निवृत्त होणार होतो. दिवसभर फोन वरून रिटायरमेंटच्या शुभेच्छा आणि अभिनंदनचे मेसेजेस. मी अक्षरश: भारावून गेलो होतो. संध्याकाळी चार वाजता सेंडऑफ झाला. सेंड ऑफ झाल्यानंतर सुद्धा मी काही consignments despatch केल्यात. शेवटच्या सेकंदपर्यंत काम केल्याचं समाधानाने गिफ्टचे बॉक्सेस घेवून मी जड पावलांनी घरी आलो. अंतःकरण एकदम जड झाले होते. परंतु चेहऱ्यावरचे हावभाव लपत नव्हते. मी निवृत्त झालो होतो. त्या वेदना जाणवत होत्या. घरी आल्यावर माझा चेहरा उमलला. बायकोने माझे स्वागत केले. थोडक्यात मी आपल्या आयुष्यात कसं योगदान दिलं आणि कुटुंबाचा गाडा कसा ओढून आणला अशी गर्वाने माझी छाती फुगून गेली. स्वर्गातल्या अप्सरा तुमच्या मागेपुढे चवऱ्या ढाळतील अश्या थाटात मी घरातल्या त्या आजूबाजूला फुगे लावलेल्या छोटया खुर्चीवर विराजमान झालो, परंतु गरम हवेचं बाष्पीभवन व्हायला वेळ लागला नाही. आणि लक्षात आलं, एकशेविसच्या स्पीडने धावणारं एक धावतं कोळशाचं इंजिन पटरी वरून खाली उतरवून आपल्याला जमिनीवर सोडून दिलं आहे आणि गेले सर्वजण निघून आपल्या मार्गाला.
रिटायर होवून एक आठवडा झाला, पण बोलायला कोणी नाही, चक्क तोंडाला कुलूप लावल्या सारखं. देवाने तोंड,नाक, कान, जीभ हे काय फुलांसारखे मिटून घेण्यासारखे थोडे दिले आहेत आपल्याला. शेजारी पाजाऱ्यांचे दरवाजे बंद. पिन ड्रॉप सायलेन्स. बरं आपल्या मिटलेल्या तोंडाच्या कुलुपाला कोणाचीच किल्ली लागत नाही. कारण प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त. दुसऱ्या दिवशी खुर्चीला बिलगलेल्या फुग्यातली हवा हळू निघायला सुरुवात झाली होती. झुकू झुकू आगीन गाडी, धुराच्या रेषा हवेत काढी हे रेडियोवर लागलेलं गाणं बरंच माझ्या मनाची समजूत काढत होते. मन कासावीस होत होतं, नव्हे अगदी रबरसारखं ताणलं जात होतं आणि तुटता तुटत नव्हतं. कोणाला सांगता ही येत नव्हतं. सांगितलं तर त्याचे निरनिराळे अर्थ लावले जातील अशी भीती वाटत होती. शांतपणे भिंतीवर शेपटी हलवत बसलेली पाल वाकुल्या दाखवत होती. त्या पालीवर झाडू घेऊन सुसाट तिच्यामागे पळत जावून दोन तीन फटकारे मारून आपला राग व्यक्त केला. पण झालं काय, झाडूचे दोन तुकडे तर झाले ! आणि पाल ही पळून गेली.
आपण जेष्ठ नागरीक आहोत. हे आपल्याला शोभत नाही. काहीतरी केले पाहिजे आणि हा गुंता सोडविलाच पाहिजे. भिंत असली म्हणजे तिच्यावर पाल फिरणारच, भाजीपाल्याची पिशवी घरी घेवून येतांना रस्त्यावर मांजर आडवी जाणारच, कोणाच्या घरात दूध अजूनपर्यंत ओतू गेलं नाही ! हे सांगा बरं. मग मी त्यांच्या पेक्षा वेगळा कसा. आपले कोणी कौतुक करेल ! का बरं अशी अपेक्षा करावी. आपणच आपल्या मुलांचे, नातवांचे, नातीचे कौतुक केले पाहिजे. त्यांच्यात रमलं पाहिजे. त्यांचे हट्ट पूर्ण केले पाहिजेत.
ऐन उमेदीच्या काळात जे आयुष्य जगायचं राहून गेलं होतं आता ती जगायची संधी आपल्याला मिळाली आहे, ती संधी सोडता काम नये. आणि अचानक बालपणाची मोरपिसे डोळ्यासमोर तरळू लागलीत. निळ्या अभाळाचे आणि चांदण्या रात्रीचे सौंदर्य रात्री धाब्यावर झोपतांना न्याहाळावे. अनेक ऋतुतले निसर्गातले बदलते मुड्स अनुभवावेत. कधी कधी कठीण प्रसंगांना सामोरे जावे. औदुंबराच्या झाडावरून डोहात उडी मारलेली आठवावी. शेतावर चक्कर मारणे, गोफणीत दगडाचा खडा ठेवून उभ्या पिकात भिरकावणे, पळसाला पाने खरोखर तीन असतात का ते मोजून बघावेत. रात्री शेतावर राखण करण्यासाठी कंदीलाची वात मोठी करून काकांबरोबर रात्र घालवावी. रात्रीच्याला भुईमुगाच्या शेंगा भाजून रात्रभर चांदणं न्याहाळत बसावं. बैल गाडीवर बसून कापसाच्या गाठी घरी घेवून येणे, बैल पोळ्याला बैलांच्या शिंगांना बेगड चिटकविणे अश्या कितीतरी गोष्टी लहानपणी सुटून गेल्या होत्या. त्या आता प्रत्यक्ष करायला मिळतील. निवृत्तीनंतरच आयुष्य खरंच मजेशीर असतं. आनंद दायी असतं. जे जगलो नाही, ते आता जगायचं असतं भरभरून, अशी इच्छा मनात पाहिजे फक्त. मानवी जीवन विविध पैलूने नटलेले असते. या जीवनाला जेवढे पैलू पाडून जगाल तेवढे ते आकर्षक होवून खुलून दिसणार. पाण्यावरचं शेवाळ बाजूला करून तर बघा, स्वच्छ, नितळ, निर्मळ पाणी आत भरपूर आहे.

बुधवार, ३ जानेवारी, २०१८
चिंचेचे पाणी जिभेला हवं हवंसं
निसर्गाने चिंच या फळात अस काही रसायन भरलं आहे की चिंच या शब्दात सुद्धा त्याचे गुण उतरले आहेत. जिभेला पाणी सुटले नाही तर नवलच, अती आंबट काहीसं गोड, नको नको म्हणत पण जिभेला हवं हवंसं ! तशाच मनाला हव्या हव्याशा वाटणाऱ्या त्या गांवाकडच्या शिवार गप्पा सुद्धा अश्याच. नाही नको म्हणत बायकांची सकाळची स्वयंपाकघरातली कामे आणि नदीवरची धुणी आटोपली की मग निवांत एक एक जणी जमा होऊन दाराशी असलेल्या उतरत्या पायऱ्यांवर जागच्या जागी पुरुष मंडळी रमी खेळतात तशा ठाण मांडून बसतात. अंगणातली सावली भिंतीवर कधी सरकते आणि भिंतीला असलेले कान सुद्धा त्या चर्वितचर्वण गप्पा, गोष्टी, बातम्या, चघाटया ऐकण्यात सामील होतात. नंतर वारू उधळावा तसे टोमणे , तिरकस, खोचक बोलण्याला उधाण येतं. या साऱ्यांमध्ये कुठेही अहंकार दिसून येत नसला तरी काही जणी आपली काठी मोडू न देता सापालाही जिवंत ठेवण्याचं कौशल्य दाखवत असतात. पण तोही आपल्याला हवा हवासा आणि फायदेशीरच असतो.
झालं काय मी मुंबईवरून गांवी गेलो. रिटायरमेंट नंतर माझ्या गावाकडच्या फेऱ्या वाढल्या होत्या. माझ्या घरासमोरील व्हरांड्यावर बायकांचा जमाव बघून मी गांगरलोच. मी माझ्या घराच्या अंगणात पोहचताच एक तिरकस शब्दाचा बाण माझ्यावर झेपावला ! काय 'बापू' घर एक महिन्यापासून बंद आणि फॅन तसाच चालू ठेवून गेला होतास की काय ! आणि आज काय गावी अचानक मध्येच येण्याची आठवण झाली. तेवढयात तोल जावून डोईवरून पाण्याचा मातीचा घडा खाली आपटून भदाक असा आवाज यावा त्याप्रमाणे दुसरी ताई टपकलीच. कापसाच्या कैरीत पडलेल्या बोण्ड अळीचं सरकारी अनुदान घ्यायला आला असेल बिचारा. हा त्यांचा तोफखाना थंड होईल असं वाटलं होतं पण छे ! दुसरा बॉम्बगोळा तयारच होता. घरात गव्हाचं पोतं होतं. घर एक महिन्यापासून बंद अवस्थेत होतं. धान्याला कीड लागून गेली होती आणि ही बातमी मला त्या बायकांकडून मिळाली. घर उघडून बघतो तर काय गव्हाचा प्रत्येक दाणा पोखरलेला. धनूर नावाचं धन लुबाडून घेऊन जाणारं कीड सैरा वैरा पळत होतं. बरं या लोकांनी लगेच उपाय देखील सांगून मोकळे झाले. धान्य अंगणात वाळत घालणे माझ्याकडून शक्य नव्हते. फॅनचं बटन खरोखरच ऑन होतं. सुदैवाने शॉर्टसर्किट झालेलं नव्हतं. आणि बोण्ड अळीचं अनुदान येणार ही गावांत चर्चा चालू होती. खरंच मला किती फायदेशीर हिंट्स मिळाल्या होत्या त्या आमच्या ताईंकडून. अशाप्रकारे नको नकोसं वाटणारं चिंचेचे पाणी काहीसं आंबट काहीसं गोड परंतु जिभेला हवंहवंसं वाटणारं असतं हे मात्र खरं.
.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)