![]() |
स्वप्नातल्या कळ्यानों ऊमलू नकाच केंव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जिवा" |
जेष्ठ कवी कै. म.पा.भावे हे बेस्टमध्ये मुंबईला नोकरीला होते. बेस्टहाऊस, कुलाबाने बोरीबंदर ऑफीस सुटल्यावर रोज ते पायी चालत येत असत. सकाळी बसने ऑफीसला जात असत. संध्याकाळचं बसभाडं ते चालत जाउन वाचवत असत.
एक दिवस ऑफीसमधून व्ही.टी.ला(CST) येत असतांना फाउंटनजवळ ऑफीस मधल्या दोन मुली एकमेकांशी बोलत चालल्या होत्या. त्यांचे बोलणे त्यांना स्पष्ट ऐकायला येत होतं. एक मुलगी दुसरीला सांगत होती की, "आपलं एखादं स्वप्नं असतं ना, ते रंगवत असतानां खूप मजा वाटते, निरनिराळ्या कल्पनांमध्ये आपण रंगून जातो. असं वाटतं की हे कधी संपूच नये, पण तेच स्वप्न खरे झाले की, त्यातली गोडीच संपून जाते. ते अपूर्ण असते तेच छान असते". हा संवाद कानावर पडला आणि उत्स्फुर्तपणे त्यांना ओळ सुचली
"गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा "
लोकल मध्ये शिरताक्षणी लायब्ररीच्या पुस्तकाच्या शेवटच्या कोऱ्या कागदावर त्या ओळी कशातरी अक्षरात लिहून ठेवल्यात. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी कविता पूर्ण केली.
"स्वप्नातल्या कळ्यानों ऊमलू नकाच केंव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जिवा"
(वरील अमूल्य माहिती वृत्तपत्र कात्रणातून जतन केली आहे.)
No comments:
Post a Comment